शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: July 17, 2014 01:04 IST

आजघडीला वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अन्नसुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी ही धोक्याची घंटी असून, यातून मार्ग काढण्यासाठी

सुहास वाणी : ‘नीरी’त जुवारकर स्मृती व्याख्यान नागपूर : आजघडीला वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अन्नसुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी ही धोक्याची घंटी असून, यातून मार्ग काढण्यासाठी संशोधकांनी जास्तीतजास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिवाय नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत तेलंगणा राज्यातील पाटणचेरू येथील ‘आयसीआरआयसॅट’चे ( इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अ‍ॅरिड ट्रॉपिक्स) संचालक डॉ. सुहास वाणी यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) आयोजित करण्यात आलेल्या डॉ. अशोक जुवारकर स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मुख्य वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित व संशोधन आणि विकास नियोजन विभागाचे प्रमुख प्रकाश कुंभारे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.गेल्या काही काळापासून पाणी आणि जमिनीची उपलब्धता कमी होत आहे. यामुळे अन्न उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यावर उपाययोजना शोधताना संशोधकांनी शेतकऱ्यांजवळ तंत्रज्ञानाचा हात नेला पाहिजे. शिवाय शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत अधिकाधिक प्रगत पद्धतींचा अवलंब झाला पाहिजे, असेदेखील डॉ. वाणी म्हणाले. दरम्यान, पडिक जमिनींची संख्या वाढत असून येथे सुपीक जमीन निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असे मत डॉ. हेमंत पुरोहित यांनी व्यक्त केले. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले तर जया सब्जीवाले यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)