जैवविविधता संरक्षणाची मोहीम व्यापक करा

By Admin | Updated: May 23, 2014 00:55 IST2014-05-23T00:55:56+5:302014-05-23T00:55:56+5:30

अलीकडे जैवविविधता संरक्षण व संवर्धनाबाबत ग्रामीण क्षेत्रात कमालीची जागरूकता निर्माण होत आहे. जैवविविधता संवर्धन काळाची गरज ठरली आहे. त्यामुळे जैवविविधता मंडळाला पशुसंवर्धन

Extend the biodiversity cover campaign | जैवविविधता संरक्षणाची मोहीम व्यापक करा

जैवविविधता संरक्षणाची मोहीम व्यापक करा

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा : प्रवीण परदेशी यांचे आवाहन

नागपूर : अलीकडे जैवविविधता संरक्षण व संवर्धनाबाबत ग्रामीण क्षेत्रात कमालीची जागरूकता निर्माण होत आहे. जैवविविधता संवर्धन काळाची गरज ठरली आहे. त्यामुळे जैवविविधता मंडळाला पशुसंवर्धन व कृषी विभागाकडून आर्थिक मदत जाहीर करून, बेटांवरील जैवविविधता संरक्षणाची मोहीम अधिक व्यापक करावी, असे आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्यावतीने आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त शुक्रवारी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी परदेशी बोलत होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०११-२०२० जैवविविधता आराखड्याच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एस. डब्ल्यू. एच. नकवी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, विभागीय आयुक्त अनुपकुमार, राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. इराच भरुचा, मंडळाचे सदस्य सचिव दिलीप सिंग व वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. निगम उपस्थित होते. यावेळी जैवविविधता संवर्धनासह नैसर्गिक पुनरुत्पादन, चिंकारा संवर्धन, मलाबार ग्लायडिंग फ्रॉग, स्मॉल क्लॉड आॅटर व ग्रेट पाईड हॉर्नबीलच्या संवर्धनावरही चर्चा करण्यात आली. तसेच विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जुन्या मालगुजारी तलावांमध्ये स्थानिक मत्स्यबीज टाकून मत्स्यसंवर्धन केल्यास तेथे पशुपक्ष्यांना खाद्यान्न मिळेल, शिवाय त्यातून जैवविविधतेची शृंखला पुनरुज्जीवित होईल, अशी आशा व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Extend the biodiversity cover campaign