शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

विस्तृत करआधार मोठे आवाहन

By admin | Updated: September 15, 2014 01:00 IST

विस्तृत करआधार हे एक मोठे आवाहन असल्याने करदात्याच्या खऱ्या उत्पन्नाचे निर्धारण करण्यासाठी आयकर अधिकाऱ्याला मदतनीस ठरणाऱ्या लेखा आणि करप्रणालीमध्ये सीएंनी तज्ज्ञ असावे,

किरण वासुदेव यांची माहिती : सीए संस्थेतर्फे चर्चासत्रनागपूर : विस्तृत करआधार हे एक मोठे आवाहन असल्याने करदात्याच्या खऱ्या उत्पन्नाचे निर्धारण करण्यासाठी आयकर अधिकाऱ्याला मदतनीस ठरणाऱ्या लेखा आणि करप्रणालीमध्ये सीएंनी तज्ज्ञ असावे, अशी माहिती राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे संचालक आणि विदर्भ विभागाचे मुख्य आयकर आयुक्त (प्रभारी) किरण वासुदेव यांनी येथे दिली. आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे ‘टॅक्स आॅडिट अ‍ॅण्ड डाक्युमेन्टेशन’, या विषयावर रामदासपेठेतील एक हॉटेलमध्ये नुकतेच चर्चासत्र घेण्यात आले. कर गोळा करण्यात सीए आणि विभागाचा मोठा सहभाग असतो. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असावे, असे वासुदेव यांनी स्पष्ट केले. मंचावर डब्ल्यूआयआरसीचे उपाध्यक्ष जुल्फेश शाह, आयसीएआयचे माजी अध्यक्ष जयदीप शाह, सीए नागपूर संस्थेचे अध्यक्ष अश्विनी अग्रवाल, सचिव स्वप्नील घाटे, माजी अध्यक्ष स्वप्नील अग्रवाल होते. वासुदेव यांनी सांगितले की, देशाचा विकास आणि प्रगतीत करदात्याचे प्रमाण योग्य नसून एकूण लोकसंख्येच्या ३ ते ५ टक्के आहे. त्यामुळेच कर संग्रहण कमी होत आहे. करवाढीसाठी सीएंनी विभागाला मदत करावी. प्रसंगी विभाग करदात्यासाठी सेवा पुरवठादार बनेल. माहिती तंत्रज्ञानामुळे कर आॅडिटचा दृष्टिकोन बदलणार आहे. त्यात अनेक दृष्टीने मोठे बदल घडून येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीबीडीटीशी संबंधित रिटर्न फायलिंग करण्याच्या तारखेत वाढ करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. भारतात ही समस्या नेहमीचीच असून योग्य वेळेत ती सोडविण्यावर आपला भर राहील. आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे घेण्यात येणारे सीपीई कार्यक्रम आणि तंत्रज्ञान व न्यूजलेटर्स लर्निंगची किरण वासुदेव यांनी प्रशंसा केली.सीए संस्थेचे अध्यक्ष अश्विनी अग्रवाल यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. चर्चासत्रात कीर्ती अग्रवाल, उमंग अग्रवाल, सुरेन दुरगकर, कीर्ती कल्याणी, जयदीप शाह, संदीप जोतवानी, औरंगाबादचे मुकेश हुंडीवाला, पुणेचे रेखा धरमकर, स्वप्नील घाटे, स्वप्नील अग्रवाल, पी.सी. सारडा, घनश्याम जोगानी, अतुल खेमका, अभय राजंदेकर, अरविंद भन्साली, सुरजीत भसीन, सचिन अग्रवाल, अंकुश देवानी, प्रियंका शर्मा, अपर्णा शंकरन् आणि ३५० पेक्षा जास्त सीए उपस्थित होते.(प्रतिनिधी)