शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यास अटक

By admin | Updated: May 23, 2014 01:13 IST

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्ध्यात कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. वाहनाच्या नवा करनाम्याकरिता १२ हजार रुपयांची लाच घेताना पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा कार्यकारी

वर्धा : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्ध्यात कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. वाहनाच्या नवा करनाम्याकरिता १२ हजार रुपयांची लाच घेताना पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा कार्यकारी अभियंता सुधीर बापूराव झोडपे याला गुरुवारी कार्यालयातच रंगेहात अटक करण्यात आली. पोलीस सूत्रानुसार, नीरज दयाराम रक्षिले (३२) रा. धन्वंतरीनगर सेवाग्राम रोड वरुड हा कार्यालयात खासगी वाहनांचा निविदानुसार पुरवठा करतो. याने पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याकडून निघालेल्या निविदा भरल्या होत्या. या निविदा मंजूर झाल्या. यानुसार १६ आॅगस्ट २०१३ पासून एमएच ३२ बी ८७५ क्रमांकाची गाडी सुरू झाली. त्याला इंधन खर्चापोटी ३० हजार मिळत होते. नंतर इंधन खर्चात वाढ झाल्याने त्याला ३५ हजार रुपये मिळायचे. हा करारनामा पूर्वी कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या काळातला होता. नंतर हा प्रभार सुधीर झोडपेकडे आला. झोडपेने रक्षिले याला तुझी गाडी दररोज ३ हजार कि.मी. चालणे अपेक्षित आहे. मात्र ती २ हजार कि.मी.च चालते. तेव्हा एक हजार कि.मी.चे इंधन वाचते. यासाठी महिन्याला चार हजार रुपयांची मागणी केली. यानुसार वाहन चालक-मालक रक्षिले झोडपेला चार हजार रुपये देत होता. नंतर झोडपेने जुना करारनामा रद्द करुन नवा करारनामा करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसे पत्रही आपल्या स्वाक्षरीनिशी वाहनधारक रक्षिले याला दिले. यासाठी झोडपे याने रक्षिलेला जुने चार हजार कायम ठेवून नव्या करारनाम्यासाठी १० हजारांची मागणी केली. ही रक्कम द्यायची नसल्यामुळे रक्षिले याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १७ मे रोजी धाव घेतली. गुरुवारी विभागाने सापळा रचला. रक्षिले १८ हजार रुपये घेऊन झोडपेकडे गेला असता त्याने आपण गरीब असल्याचे सांगून काही रक्कम कमी करण्याची विनंती केली. तेव्हा झोडपेने १२ हजार रुपयांची लाच स्वीकारली. यानंतर एसीबी पथकाने सदर कार्यकारी अभियंत्यास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांनी पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)