शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाबाबत नक्षली व भाजपमध्ये समानता; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर

By कमलेश वानखेडे | Updated: November 8, 2024 15:56 IST

भूपेश बघेल यांची टीका : नक्षलवाद्यांकडून काँग्रेसचे मोठे नुकसान

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नोटवर्क नागपूर : नक्षलवाद्यांनी जेवढे नुकसान काँग्रेस पक्षाचे केले आहे तेवढे कोणाचेच केले नाही. छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये मंत्र्यांसह अनेक नेते आम्ही गमावले आहेत. नक्षली संविधान मानत नाहीत आणि भाजप संविधान नष्ट करू पाहत आहे. या दोघांमध्येही समानता आहे, अशी टीका छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली.भूपेश बघेल शुक्रवारी सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलता म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही हे सरकार अवैध असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी हे संविधान संमेलन करत आहे. राहुल गांधींचा वाढत्या आलेखामुळे भाजप घाबरली आहे. भाजपने संविधान बदलण्याचे भाष्य केले. लोकसभेत विषय चर्चेला आला. आता संविधान रक्षासाठी पक्ष आणि अनेक संघटना सोबत आल्या आहेत. फडणवीस यांनी संविधानाच्या पुस्तकाचा नक्षली रंग असल्याचे वक्तव्य केले. लाल रंगापासून फडणवीस यांना काय त्रास आहे. लाल रंग देवीच्या ओढणीचा आहे, बजरंग बलीचा आहे, सूर्याचा उगवताना आणि मावळताना रंग लाल आहे. राहुल गांधींच्या संमेलनात दिला तो नोट पॅड होता, भाषणाचे पॉइंटर लिहण्यासाठी तो दिला होता. त्या रंगावर का जाता, पहिले हिरव्या रंगाचा त्रास होता, आता लाल रंगाचा त्रास आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नैराश्यात आले आहे, असा चिमटा त्यांनी घेतला. कंटेंगे बटेंगे म्हणतात. इथे तोडण्याची नाही तर जोडण्याची चर्चा झाली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. महाविकास आघाडी सरकार लाडकी बहीण योजना बंद करेल, अशी टीका करत आहेत. पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीने पंचसूत्री योजना आणली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. विकास ठाकरे, अ.भा. काँग्रेसचे महासचिव रामकिशन ओझा, प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

गडकरींचा भाजपकडून अपमान

देशाता संवैधानिक व्यवस्था लागू आहे पण प्रत्यक्षात आणीबाणीपेक्षा वाईट स्थिती आहे. जो विरोधात बोलतो, लिहितो त्यावर ईडी, सीबीआय लावली जाते. नितीन गडकरी यांनी स्वत:च्या स्थितीबद्दल सांगावे. गडकरी यांचा जेवढा अपमान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला तेवढा यापूर्वी कधीही कुठल्याच पार्टीने केला नाही, असा टोलाही बघेल यांनी लगावला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरcongressकाँग्रेसBJPभाजपा