शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानातूनच घडेल सक्षम भारत

By admin | Updated: January 13, 2015 01:06 IST

नागरिकीकरण, प्रदूषण यासारख्या समस्यांमुळे भविष्यात मोठा धोका संभवतो. या समस्यांवर संशोधनाच्या माध्यमातूनच नियंत्रण आणता येणे शक्य होणार आहे. यात संशोधकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

संजय देशमुख : ‘इन्स्पायर’ विज्ञान शिबिराचे थाटात उद्घाटननागपूर : नागरिकीकरण, प्रदूषण यासारख्या समस्यांमुळे भविष्यात मोठा धोका संभवतो. या समस्यांवर संशोधनाच्या माध्यमातूनच नियंत्रण आणता येणे शक्य होणार आहे. यात संशोधकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सक्षम भारताच्या उभारणीचा मार्ग विज्ञानातूनच मिळणार असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे जैविक विज्ञानाचे अभ्यासक व शास्त्रज्ञ डॉ.संजय देशमुख यांनी व्यक्त केले. ‘इन्स्पायर’(इनोव्हेशन इन सायन्स परसुईट फॉर इन्स्पायर रिसर्च) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित विज्ञान मार्गदर्शन शिबिराचे शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. ‘इन्स्पायर’च्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके, डॉ. रमेश ठाकरे, प्राचार्य डॉ. देवेंद्र बुरघाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला नागपूर तसेच अमरावती विभागातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे.नैसर्गिक विज्ञान हा उच्च शिक्षणाचा मूळ गाभा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विज्ञानातूनच आयुष्यात चांगल्या संधी निर्माण होतात. विज्ञान प्रगती आव्हानात्मक होण्यासाठी ‘इन्स्पायर’सारखे प्रकल्प मार्गदर्शक ठरतील असे देशमुख म्हणाले. ‘इन्स्पायर’मधून विद्यार्थ्यांना पुस्तकापलीकडच्या विज्ञानाच्या जवळ जाण्याची संधी मिळेल. यातून त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल असे प्रतिपादन अ‍ॅड.शेळके यांनी केले. प्राचार्य डॉ. बुरघाटे यांनी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पहिल्या दिवशी रसायनशास्त्राचे शास्त्रज्ञ डॉ.सी.पी.राव यांनी विज्ञानाची व्यवसाय म्हणून का निवड करावी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर जैविक विज्ञानतज्ज्ञ डॉ.शर्मिला मांडे यांनी ‘हाऊ मायक्रोब्ज रुल द वर्ल्ड’ या विषयावर व्याख्यान दिले. समन्वयक डॉ. वझलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालन कांचन दाते यांनी केले तर उपसमन्वयक दीपक कडू यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दर्शना कोकाटे यांनी आभार मानले. यावेळी ‘इन्स्पायर’शिबिराच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.(प्रतिनिधी)