शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

आपात्कालीन रुग्णांना औषध मिळणे कठीण!

By admin | Updated: November 11, 2014 01:01 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) आपात्कालीन रुग्णांना औषध वितरित करण्यासाठी असलेली खिडकी बंद केली आहे. परिणामी, रुग्णांना सहज औषध मिळणे कठीण झाले आहे.

मेडिकल : खिडकीवरून औषध वितरण बंदनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) आपात्कालीन रुग्णांना औषध वितरित करण्यासाठी असलेली खिडकी बंद केली आहे. परिणामी, रुग्णांना सहज औषध मिळणे कठीण झाले आहे. मेडिकल प्रशासनाने परिचारिकांकडून औषधोपचार करण्याची नवी पद्धत सुरू केली असली तरी अनेकांना औषध मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जुन्या आपात्कालीन विभागाच्या बाजूला दुपारी २ ते सकाळी ८ वाजतापर्यंत औषध वितरणाची एक खिडकी सुरू असायची. आपात्कालीन रुग्णांना या खिडकीवरूनच औषधे मिळायची. आपात्कालीन रुग्णांना वेळेवर औषधी मिळावी किंबहुना औषधांविना रुग्णाचा जीव जाऊ नये म्हणून प्रशासनाने ही व्यवस्था केली होती. परंतु १५ दिवसांपूर्वी अचानक ही खिडकी बंद करण्यात आली. यामुळे रुग्णांना औषध मिळणे कठीण झाले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, औषध वितरण खिडकीच्या परिसरात रात्री अंधार राहत असल्याने व फार कमी रुग्णांना औषध वितरित होत असल्याने मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ यांनी ही खिडकी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी औषध वितरणाची जबाबदारी परिचारिकांकडे सोपविली आहे. आपात्कालीन रुग्ण आल्यास परिचारिकांकडून औषध दिले जात आहे. मात्र, संबंधित परिचारिकाकडे आधीच कामाचा भार असल्याने या नवीन जबाबदारीमुळे रुग्णांना सहज औषध मिळणे दुरापास्त झाले आहे. या नव्या पद्धतीचा फटका अनेक रुग्णांना बसत असून, त्यांच्यावर बाहेरून औषध घेण्याची वेळ आली आहे. बंद करण्यात आलेली खिडकी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विविध सामाजिक संस्थांकडून होत आहे. (प्रतिनिधी)