शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

संगणक प्रशिक्षणाच्या नावाखाली १५ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:07 IST

: महिला व बालकल्याण समिती सदस्याचा सभापतींवर आरोप नागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उज्वला ...

: महिला व बालकल्याण समिती सदस्याचा सभापतींवर आरोप

नागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे यांच्यावर संगणक प्रशिक्षणाच्या नावाखाली १५ लाखांचा अपहार केल्याचा ठपका समितीच्या सदस्य राधा अग्रवाल यांनी ठेवला आहे. कोरोनाच्या काळात सर्व बंद असताना संगणकाचे प्रशिक्षण कुणाला आणि कोठे दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विशेष म्हणजे नुकताच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राधा अग्रवाल यांनी समितीच्या सदस्यांना अंधारात ठेवून सभापतींनी दीड कोटीची खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर च्यवनप्राशच्या मुद्यावरून सभापतींनी समितीची दिशाभूल केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवला होता. सभापतीच्या विरुद्ध सदस्यांकडून जाहीर आरोप होत असताना सभापतींनी साधलेल्या चुप्पीमुळे चर्चांना उधाण येत आहे. आर्थिक घोटाळ्यावरही शंका उपस्थित केली जात आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडांतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात वर्ग सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात आली. त्यासाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली होती. प्रति प्रशिक्षणार्थी ४ हजार २०० रुपयांचे अनुदान देण्याचे प्रस्तावित होते. मार्च २०२० पासून जिल्ह्यात लॉकडाऊन लागला. शिवाय सर्व शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. त्या काळात मुलींना संगणक प्रशिक्षण कसे दिले? असा सवाल सदस्य राधा अग्रवाल यांनी उपस्थित केला. विभागाद्वारे यावर १४ लाख ८६ हजार २०० रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. जर प्रशिक्षणच झाले नाही. तर तो निधी सभापतींनी परस्पर हडपला का? असा गंभीर आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषदेतील सदस्यांसह समिती सदस्यांना या योजनेबाबत विचारणा केली असता त्यांच्या सर्कलमध्ये असे प्रशिक्षणच झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

- प्रशिक्षणच झाले नाही. तर विभागाने खर्च कसा दाखविला, हे कोडेच ठरत आहे. विभागात संगणक प्रशिक्षण घोटाळा झाला असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार.

राधा अग्रवाल, सदस्य, महिला व बाल कल्याण समिती