आंबेकरच्या बंगल्यावर वीजचोरी

By Admin | Updated: March 5, 2016 03:07 IST2016-03-05T03:07:16+5:302016-03-05T03:07:16+5:30

कुख्यात संतोष आंबेकर याच्या निवासस्थानी विजेची चोरी होत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली.

Electricity bill at Ambekar's bungalow | आंबेकरच्या बंगल्यावर वीजचोरी

आंबेकरच्या बंगल्यावर वीजचोरी

लाखोंची वीजचोरी उघड : एसएनडीएलची कारवाई
नागपूर : कुख्यात संतोष आंबेकर याच्या निवासस्थानी विजेची चोरी होत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली. आंबेकरच्या बंगल्यावर लाखोंची वीजचोरी केली जात असल्याची माहिती मिळाल्याने एसएनडीएल तसेच पोलिसांच्या पथकाने आज दुपारी आंबेकरच्या बंगल्यावर छापा मारला. यावेळी त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी वीज मीटर कुठे आहे, अशी विचारणा केली. पंच आणि व्हीडीओ कॅमेऱ्यासमोर वीज मीटरची तपासणी केली असता एक मायक्रोचिप पोलिसांना मीटरला लावल्याचे दिसले. ही चिप रिमोटच्या माध्यमातून संचालित केली जात होती. त्यामुळे कितीही वीज जाळली तरी मनासारखे रिडींग ठेवता येत होते. अशा प्रकारे संतोष अनेक वर्षांपासून वीजचोरी करीत असल्याचा संशय आहे.
दरम्यान, मालमत्तेवर कब्जा करणे, खंडणी वसुली, मांडवलीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गोळा करणाऱ्या संतोषचा हा नवा उद्योग पुढे आल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Electricity bill at Ambekar's bungalow