शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

इबोलाचे रुग्ण पेर्इंग वॉर्डात!

By admin | Updated: November 1, 2014 02:48 IST

सर्वत्र दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचे थैमान भारतात होता कामा नये, यासाठी नागपूर विमानतळावर उपाययोजना म्हणून ..

नागपूर : सर्वत्र दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचे थैमान भारतात होता कामा नये, यासाठी नागपूर विमानतळावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची चमू तैनात करण्यात आली आहे. परंतु रुग्ण आढळून आल्यास त्याच्या उपचारासाठी मेडिकलचा ‘पेर्इंग वॉर्ड’ तयार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच्या मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पश्चिम आॅफ्रिकेत थैमान घालणाऱ्या इबोला आजाराची व्याप्ती वाढत चालली आहे. दिवसेंदिवस जगभरात या आजाराचा धोका वाढला आहे. इबोलाला रोखण्याच्या प्रयत्नात वाढ झाली नाही तर, पुढच्या ६० दिवसात दर आठवडयाला इबोलाचे दहा हजार रु ग्ण तयार होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, नागपूरचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळाला भेट घेऊन संबंधित विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विमानतळावर संक्रमण आजार नियंत्रण खोलीची पाहणी केली. यावेळी विमानतळावर संशयित रुग्ण आढळून आल्यास त्याला योग्य उपचार मिळावा यासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशीही त्यांनी भेटून चर्चा केली. डॉ. जयस्वाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आरोग्य विभागाला कमी वेळात वेगळा ‘आयसोलेशन वॉर्ड’ तयार करणे शक्य नाही. यासाठी मेडिकलची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. नुकतेच मेडिकलच्या पेर्इंग वॉडाची पाहणी करण्यात आली.या वॉर्डाला आयसोलेशन वॉर्डात रूपांतरित करणे शक्य असल्याचे दिसून आले. हा वॉर्ड इतर वॉर्डांपासून दूर आहे. ये-जा करण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने या वॉर्डात पाच व्हेंटिलेटर मशीन, आॅक्सिजन व सक्शन पाईपलाईनची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. या संदर्भात आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सुजाता सौनिक यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी या संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)