शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

देखभाल नसल्याने सीताबर्डी रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: November 10, 2015 03:30 IST

उपराजधानीतील वर्दळीच्या सीताबर्डी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ च्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याने या मार्गाची दुर्दशा झाली आहे.

वाहनधारक त्रस्त : सहा महिन्यानंतर सुरू होणार कामनागपूर : उपराजधानीतील वर्दळीच्या सीताबर्डी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ च्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याने या मार्गाची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण झिरो माईल ते कन्हान दरम्यानच्या महामार्ग सिमंन्ट क्राँक्रिटचा करणार आहे. परंतु या कामाला सुरुवात होण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. इतर शहरातून नागपुरात येणारे बहुसंख्य लोक सीताबर्डी येथे खरेदीसाठी येतात, तसेच येथून महामार्ग गेला असल्याने या मार्गावरून वाहनांची ये-जा असते. सीताबर्डी हा भाग महत्त्वाचा असूनही येथील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे इतर शहरातून नागपुरात खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनात नागपूर शहराविषयी वाईट प्रतिमा निर्माण होते. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. झिरो माईल ते सीताबर्डी पोलीस स्टेशन या दरम्यानचा मार्ग नादुरुस्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरील मार्ग काठाने उखडला आहे. महापालिकेतर्फे या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाही. या मार्गावर खड्डे असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. (प्रतिनिधी)