शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीची राखी बांधून दिला व्यसनमुक्तीचा संदेश

By कमलेश वानखेडे | Updated: August 30, 2023 14:38 IST

तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी 'ड्रग्ज फ्री नागपूर संकल्पना'

नागपूर :रक्षाबंधनाच्या सणाला जिल्हा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा संघटक गौरव आळणे यांच्या वतीने व्यसनमुक्तीची राखी बांधून जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. यावेळी "ड्रग्ज फ्री नागपूर" बनविण्याकरिता व्यसनमुक्तीचा प्रचार - प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट मत किशोर भोयर यांनी व्यक्त केले.

शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी उपाययोजनांची गरज असून नागपूर शहरात व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची गैर मार्गाने विक्री करणाऱ्यावर कारवाई व्हावी, असे ड्रग्ज रॅकेट समाजातून हद्दपार झाले पाहिजे, असा मानस भोयर यांनी व्यक्त केला.

आगामी काळात नागपूरमध्ये "ड्रग्ज फ्री नागपूर " व "युथ अगेन्स ड्रग्स क्लब" अशा संकल्पना प्रत्येक शाळा, महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात राबवण्याची नितांत गरज आहे. व्यसनमुक्तीच्या प्रचार प्रसारकरीता नियोजन संदर्भात कार्यालयाला कळवावे. निश्चितच जिल्हा समाज कल्याण व्यसनमुक्तीच्या कार्यात शासकीय धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर आहे. नागपूरमधील अधिका अधिक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगितले पाहिजे.सोबतच समाज कल्याण विभाग कार्यालयीन अधीक्षक प्रवीण मुंडे व निरीक्षक प्रतिभा सुखदेवे यांना सुद्धा व्यसनमुक्तीची राखी बांधण्यात आली.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनRakhiराखीliquor banदारूबंदीnagpurनागपूरSocialसामाजिक