शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाच्या बसला ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 03:05 IST

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या खासगी बसला ट्रकचालकाने धडक मारल्यामुळे १० वऱ्हाडी जबर जखमी झाले.

२२ वऱ्हाडी जखमी : १० जणांना जबर दुखापत, आरोपी ट्रकचालक गजाआड नागपूर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या खासगी बसला ट्रकचालकाने धडक मारल्यामुळे १० वऱ्हाडी जबर जखमी झाले. गुरुवारी सकाळी ६.३० ला इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील अशोक चौकाजवळ हा भीषण अपघात झाला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. गारला (कामठी) येथील यादव मोळकूजी चिंचुलकर (वय ६५) यांचा भाचा किशोर भोयर याचे आज गिरड (जि. वर्धा) येथे लग्न होते. त्यामुळे लग्नासाठी खापरखेडा येथून दोन खासगी बसमध्ये बसून वऱ्हाडी गिरड जि. वर्धा येथे निघाले. एक बस पुढे निघून गेली तर, दुसरी ३० ते ३५ वऱ्हाडी बसलेली बस (एमएच ३१/ एमपी ७६११) अशोक चौकाजवळ आली. तेवढ्यात भरधाव वेगात असलेल्या ट्रकने (सीजी ०४/ ई ८२६५) बसला जोरदार धडक मारली. त्यामुळे बसमधील २० ते २२ वऱ्हाडी जखमी झाले. त्यातील चिंतामणी अंतुजी वाणी, स्वप्नील वाणी, विकास दशरथ गिरी, राजू गायधने, लीलाबाई सरडे, कमलाबाई बोरकर, आसाराम मंडपे, ललिता उपारे, ज्योती महाजन आणि भावेश गिरे यांना जबर जखमा झाल्या. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकावर धाव घेतली. मात्र, आरोपी चालकाने स्वत:ला ट्रकच्या कॅबिनमध्ये बंद करून घेतले. वेळीच पोलीस पोहोचल्याने संभाव्य अनर्थ टळला. इमामवाडा पोलिसांनी आरोपी ट्रकचालक रिजवान हसन कयामुल हसन (वय २५, रा. फतेहपूर जि. उत्तर प्रदेश) याला अटक केली. नवरदेवाची धावपळ ट्रकने धडक दिल्यामुळे जोरदार आवाज झाला अन् बसमधील प्रवासी एकमेकांवर पडले. कुणाला सीटच्या तर कुणाला खिडकीच्या बाजूला असलेल्या लोखंडी पट्ट्या लागल्या. त्यामुळे महिला-मुलांच्या किंकाळ्या सुरु झाल्या. दरम्यान, समोरच्या बसमध्ये असलेल्या नवरदेवाला एका नातेवाईकाने फोन करून ही माहिती दिली. त्याने लगेच बस माघारी फिरवली. अपघातात जखमी झालेल्या नातेवाईक, वऱ्हाड्यांना मेडिकलमध्ये नेले. तेथे उपचार करून घेतल्यानंतर पुन्हा वऱ्हाडाची बस गिरडकडे निघाली.