शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या विकासाला सुरुवात

By admin | Updated: July 15, 2014 01:15 IST

कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या कार्याच्या प्रगतीसाठी वैद्यकीय शिक्षण

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी बोलवली बैठक नागपूर : कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या कार्याच्या प्रगतीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी बुधवारी बैठक बोलविली. यात रुग्णालयाच्या बांधकामासोबतच, पदभरती व अतिविशेषोपचार अभ्यासक्र मावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. ‘एम्स’च्या घोषणेसोबतच आता या रुग्णालयाच्या विकासाची कार्य हाती घेण्यात येत असल्याने शहराची वाटचाल देशाचे मध्यवर्ती मेडिकल हब होण्याच्या दिशेन सुरू झाली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र हे बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. ३ मार्च रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्था स्थापन करण्यावर निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पाच वर्षांमध्ये हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. आता हेच रुग्णालय ५६८ खाटांचे होणार आहे. रु ग्णालयाकडे सध्या २९ हजार ७९ चौरस मीटरची जागा उपलब्ध आहे. त्यावर आता बांधकामासाठी ४९९९३ चौरस मीटर बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी होणाऱ्या बैठकीत बांधकामासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०७३ पदे भरण्याला प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. यात प्राध्यापकांची २१, सहयोगी प्राध्यापकांची २३, सहायक प्राध्यापकांची ३६, वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११, परिसेविकांची ५०, अधिपरिचारिकांची ३४३ तर वर्ग तीन व चारची पदेही भरली जाणार आहेत. (प्रतिनिधी) शहराची वाटचाल मेडिकल हबकडेमेयो, मेडिकल, डागासह सुपरस्पेशालिटी रुग्णालयासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राचा विकास आणि ‘एम्स’ची घोषणा यामुळे शहराचे मेडिकल हब होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. डॉ. आंबेडकर रुग्णालयात औषध वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, बालरोगशास्त्र, चर्मरोगशास्त्र, सायकॅट्रिक, नेत्ररोगशास्त्र, नेफ्रॉलॉजी, युरॉलॉजी, हिमॅटॉलॉजी, इएनटी, सीव्हीटीएस, ट्रॉमा केअर, अपघात विभाग, भूल विभाग, न्यूरॉलॉजी, न्युरोसर्जरी या सारखे पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार विभाग असणार आहे. याचा फायदा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात तज्ज्ञ फॅकल्टी उपलब्ध होण्यासोबतच रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.