शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊन, ग्राहकांना मनस्ताप

By admin | Updated: August 15, 2014 00:41 IST

बँक आॅफ इंडियाच्या हजारो ग्राहकांना गुरुवारी बँकेतून आल्यापावली परतावे लागले. डाटा सेंटरमधून सर्व्हरमध्येच बिघाड असल्याने पैशाचे व्यवहार ठप्प होते. पैसे देणेही बंद आणि घेणेही बंद

बँक आॅफ इंडिया : डाटा सेंटरमधूनच होता बिघाडनागपूर : बँक आॅफ इंडियाच्या हजारो ग्राहकांना गुरुवारी बँकेतून आल्यापावली परतावे लागले. डाटा सेंटरमधून सर्व्हरमध्येच बिघाड असल्याने पैशाचे व्यवहार ठप्प होते. पैसे देणेही बंद आणि घेणेही बंद असल्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या कारभाराविषयी रोष व्यक्त केला. लाखो ग्राहकांशी नाते जोडलेल्या बँक आॅफ इंडियाच्या सर्वच शाखांमधील सर्व्हरमध्ये आज सकाळी ८ वाजेपासूनच बिघाड झाला. या तांत्रिक दोषामुळे व्यवहारावर परिणाम झाला. प्रत्येक ग्राहक विचारपूस करून परतत होता. बँक बंद होईस्तोवर ही परिस्थिती राहिल्याने अनेकांना ताटकळत उभे राहूनही काहीच फायदा झाला नाही. बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळपासूनच डाटा सेंटरमधून बिघाड झाला. त्यामुळे या ठिकाणी सर्व्हरची लिंकिंग नव्हती. प्रत्येक शाखेमध्येच हा बिघाड झाला होता; कारण तांत्रिक दोष मुंबईच्या कार्यालयातून होता. दुपारपर्यंत सर्व्हर सुरू होण्याची शक्यता होती. परंतु तांत्रिक दोष मोठा असल्याने दुरुस्ती होऊ शकली नाही. ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्येकालाच उत्तर द्यावे लागत होते. सकाळी बँकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दुपारी १ पर्यंत येऊन पाहा, असे उत्तर दिले. मात्र, तोपर्यंत हा बिघाड कायमच होता. या बँकेत व्यापारी, कर्मचाऱ्यांसह हजारो ग्राहकांची खाती आहेत. शहरातील सर्वच शाखांमध्ये सकाळपासून ही परिस्थिती असल्याने, अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागले. पुन्हा दुपारी ३ वाजेपर्यंत हा दोष दुरुस्त होण्याची शक्यता काही कर्मचाऱ्यांनी वर्तविली होती. मात्र, नंतरही तीच परिस्थिती कायम राहिली. परिणामी, बँकेतील रोखपालांनी आपल्या काऊंटरवर बंदचाच फलक लावला. मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तर देणे अनिवार्य झाले होते. आज कामकाजाचा दिवस, उद्या स्वातंत्र्यदिनाची सुटी आणि परवा शनिवार अर्धवेळ कामकाजाचा दिवस व नंतर रविवारची सुटी यामुळे अनेक ग्राहकांना बँकेच्या या तांत्रिक बिघाडामुळे पैशाविनाच सुटीचे आणि खरेदीचे बेत आखावे लागणार आहेत.(प्रतिनिधी)