शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

मालकी हक्काच्या पट्ट्यासाठी खिसा खाली करा!

By admin | Updated: July 15, 2015 03:27 IST

नासुप्र : रेडिरेकनरच्या ५० टक्के शुल्क आकारण्याचा प्रस्ताव

नागपूर : शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क ाचे पट्टे मिळतील, परंतु यासाठी त्यांना खिसा खाली करावा लागणार आहे. निवासी वापराच्या पट्ट्यावर रेडिरेकनरच्या ५० टक्के शुल्क वसूल करण्याची तयारी सरकारने केली आहे. मात्र विश्वस्त मंडळाच्या बैठकीत २५ टक्के शुल्क आकारण्याला मंजुरी दिली असून, प्रस्ताव निर्णयासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.बैठकीत तीन अधिकाऱ्यांनी ५० टक्के शुल्काचे तर विश्वस्तांनी २५ टक्के शुल्क आकारण्यााचे समर्थन केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत ३० जानेवारी २०१५ रोजी बैठक घेण्यात आली होती. यात नासुप्रच्या माध्यमातून झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यासाठी मनपाचे प्राधिकरण नियुक्त करण्यात आले होते. परंतु बैठकीतील मिनिटस्च्या आधारे नासुप्रने पट्टे वाटपाची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. शहरात ४२१ झोपडपट्ट्या आहेत. यात मनपाच्या १४, नासुप्रच्या ५० तर महसूल विभागाच्या जागांवरील २०० झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी मनपा नासुप्रला मदत करण्यास इच्छुक आहे. मालकी हक्काच्या पट्ट्यासाठी झोपडपट्टीधारकांना निर्धारित शुल्क भरावे लागणार आहे. घराचे बांधकाम करावयाचे असल्यास नियमानुसार विकास शुल्क द्यावे लागेल. या जागेचा व्यावसायिक वापर करावयाचा असल्यास रेडिरेकनरनुसार शुल्क द्यावे लागेल. नासुप्रचे विश्वस्त छोटू भोयर व रमेश सिंगारे यांनी २५ टक्के शुल्क वसूल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जनहित विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु नासुप्रचे सभापती, जिल्हाधिकारी व नगर रचना संचालकांनी ५० टक्के शुल्क आकारण्याला मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)