शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

गुमगाव शिवारात ‘डबल मर्डर’

By admin | Updated: May 3, 2015 02:02 IST

तालुक्यातील गुमगाव शिवारातील गुमगाव - वडगाव (गुजर) मार्गाच्या कडेला असलेल्या नालीत दोन अनोळखी तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

हिंगणा : तालुक्यातील गुमगाव शिवारातील गुमगाव - वडगाव (गुजर) मार्गाच्या कडेला असलेल्या नालीत दोन अनोळखी तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या दोघांच्या डोक्याला खोल जखमा असल्याने त्यांचा इतरत्र खून करून मृतदेह गुमगाव शिवारात फेकले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे दोन्ही मृतदेह शनिवारी दुपारी ३च्या सुमारास आढळून आले. गुमगाव - वडगाव (गुजर) मार्गाने जाणाऱ्या काही नागरिकांना या मार्गाच्या कडेला दोन तरुणांचे मृतदेह पडले असल्याचे आढळून आले. नागरिकांनी लगेच सदर प्रकाराची माहिती हिंगणा पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. या संदर्भात हिंगण्याचे ठाणेदार दीपक वानकडे यांनी सांगितले की, दोघेही तरुण अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत. यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या दोघांच्याही डोक्याला सहा बाय दोन इंच खोल जखमा असून, शरीरावर कुठेही जखमा नाहीत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर जाड्या लोखंडी रॉडने प्रहार केला असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दोघेही राजस्थानातील रहिवासी आणि ट्रकचालक व वाहक असावे. ते या परिसरात ट्रक घेऊन आले असावे. त्यातच अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडवून डोक्यावर ट्रकमधील रॉडने प्रहार करून त्यांचा खून केला असावा. त्यानंतर दोघांचेही मृतदेह गुमगाव शिवारात फेकून ट्रक घेऊन पळून गेले असावे, असा अंदाज दीपक वानखडे यांनी व्यक्त केला. एकाची उंची पाच फूट असून, गौर वर्ण आहे. त्याच्या उजव्या हातावर ‘उरोसिंह गुरधर’ असे गोंदलेले आहे. दुसरा तरुण सावळ्या वर्णाचा असून, त्याच्या हातावर ‘संजय ऊर्फ संजयसिंह गारवाल’ असे गोंदलेले आहे. (प्रतिनिधी)