शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रेड सिग्नल ओलांडून पुढे जाऊ नका : लोकोपायलटसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:26 AM

रेल्वेगाडीच्या संचालनात लोकोपायलटची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे लोकोपायलटने रेड सिग्नल सुरू असताना गाडी पुढे नेऊ नये, असे आवाहन मान्यवरांनी केले.

ठळक मुद्देसुरक्षितरीत्या रेल्वेगाडी चालविण्याचे आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेगाडीच्या संचालनात लोकोपायलटची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे लोकोपायलटने रेड सिग्नल सुरू असताना गाडी पुढे नेऊ नये, असे आवाहन मान्यवरांनी केले.मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या निर्देशानुसार लोकोपायलट लॉबीत लोकोपायलटसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत ७० नवनियुक्त सहायक लोकोपायलट, ५० लोकोपायलट उपस्थित होते. रेल्वेच्या सुरक्षित संचालनासाठी रेड सिग्नल ओलांडु नये, वैयक्तिक सुरक्षेकडे लक्ष द्यावे आदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विभागीय वरिष्ठ विद्युत अभियंता महेश कुमार यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. सुरक्षितरीत्या रेल्वे चालवून शून्य टक्के अपघाताचे ध्येय गाठण्याचे आवाहन त्यांनी केले. अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एन. के. भंडारी यांनी यावेळी आपले अनुभव सांगून सुरक्षित रेल्वे संचालनाचे गुण शिकविले. कार्यशाळेत वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी ए. बी. दाभाडे, सहायक विभागीय यांत्रिक अभियंता कमलेश कुमार, गुलाब सिंह यादव, ए. के. देशमुख, के. दिवाकर यांनी सुरक्षेच्या नियमांची माहिती देऊन जुन्या अपघातांपासून धडा घेऊन चुकांची दुरुस्ती करण्याचे तसेच वैयक्तिक सुरक्षेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. संचालन मुख्य लोको निरीक्षक सुशील तिवारी यांनी केले. कार्यशाळेला रेल्वेचे अधिकारी, लोको पायलट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर