शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गणपती २ फुट तर सार्वजनिक ४ फूटाहून कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 20:48 IST

‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शन सूचना जारीसोशल मीडियावर दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शहरी भाग वगळता नागपूर जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावे तसेच सजावटदेखील जास्त आकर्षक ठेवू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट तर घरगुती गणपती २ फुटाच्या मर्यादेतील असावे. नागरिकांनी पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे.गणेशोत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे, असेदेखील जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. गणेश दर्शनाची सुविधा आॅनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी, असेदेखील सार्वजनिक मंडळांना आवाहन करण्यात आले आहे.शक्य असल्यास विसर्जन पुढे ढकलाघरी विसर्जनाची सोय नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जन किंवा पुढील वर्षी अनंत चतुर्दशीला विसर्जन करावे, असेदेखील या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.थर्मल स्क्रीनिंग व्हावेगणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्याभाविकांकडून कोरोनाच्या बाबतीतील सर्व नियम पाळले जात आहे की नाही याकडे लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव