शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांना मिळणार स्वत:ची ‘ओळख’?

By admin | Updated: January 31, 2015 02:16 IST

सामाजिक जीवनातील भाग असतानादेखील तृतीयपंथीयांना अनेक अधिकारांपासून वंचित रहावे लागते. विशेषत: शिक्षण घेत असताना एखादा अर्ज भरत असताना स्वत:ची ओळख ...

योगेश पांडे नागपूर सामाजिक जीवनातील भाग असतानादेखील तृतीयपंथीयांना अनेक अधिकारांपासून वंचित रहावे लागते. विशेषत: शिक्षण घेत असताना एखादा अर्ज भरत असताना स्वत:ची ओळख नेमकी काय सांगावी हा प्रश्न त्यांच्यासमोर नेहमीच पडतो. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लवकरच तृतीयपंथीयांना स्वत:ची वेगळी ओळख मिळणार आहे. विविध अर्जांमध्ये लिंगओळख सांगणारा ‘तृतीयपंथी’ हा एक वेगळा रकाना ठेवण्याबाबत शनिवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने याला अगोदरच मान्यता दिली आहे.साधारणत: परीक्षा किंवा शिष्यवृत्ती अर्जावर तृतीयपंथी विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख केवळ ह्यस्त्रीह्ण अथवा ह्यपुरुषह्ण या दोन रकान्यांपैकी एकामध्ये ह्ययोग्यह्णची खूण करून करून द्यावी लागते. त्यामुळे ‘तृतीयपंथी’ उमेदवारांसमोर अडचण निर्माण होते. स्वत:ची नेमकी ओळख सांगता येत नसल्यामुळे मनातल्या मनात घुसमटदेखील होते. संविधानानुसार तृतीयपंथीयांना त्यांची ओळख सांगण्याचा अधिकार आहे व यासाठी पावले उचलण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. याचा आधार घेत विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नागपूर विद्यापीठासह देशातील सर्वच विद्यापीठांना पत्र पाठविण्यात आले होते. यूजीसीच्या निर्देशांमुळे या विद्यार्थ्यांना स्वतंत्र रकाना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय व विद्यापीठात स्वतंत्र स्वच्छतागृहे, कॉमनरुम इत्यादी सुविधा देण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. शिवाय तृतीयपंथीयांबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी अभ्यासक्रमातदेखील त्यांच्याबाबत योग्य माहितीचा समावेश करण्यात यावा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची गरज असल्याच्या सूचनादेखील आयोगाने केल्या आहेत. या पत्रावर २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. सखोल चर्चेनंतर या बदलांना मान्यता देण्यात आली होती व पुढील मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेकडे हा मुद्दा वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत या मुद्द्याचा समावेश करण्यात आला असून यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. व्यवस्थापन परिषदेने जर हिरवी झेंडी दाखवली तर यापुढे स्वत:ची स्वतंत्र ओळख सांगण्याची संधी तृतीयपंथीयांना विद्यापीठात मिळणार आहे.