शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या पुतळ्यांना जातींमध्ये वाटू नका

By admin | Updated: March 26, 2015 02:35 IST

महापुरुष कोणताही एक समाज, जात किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांच्या पुतळ्यांना जातीधर्मानुसार वाटून घेऊ नका,...

नागपूर : महापुरुष कोणताही एक समाज, जात किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांच्या पुतळ्यांना जातीधर्मानुसार वाटून घेऊ नका, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले.अमरावती मार्गावरील सर्वोदय आश्रम येथे बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या अर्धपुतळ्याचे धर्माधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. जमनालाल बजाज पुरस्काराचे मानकरी जयवंत मठकर, ज्येष्ठ पत्रकार दि.भा. उपाख्य मामा घुमरे व डॉ. विभावरी लेले हे प्रमुख अतिथी होते.धर्माधिकारी यांनी देशातील वर्तमान परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियामुळे नात्यातील गोडवा हरवला आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून इंटरनेटवर चॅटिंग करतात; पण आमोरासामोर असल्यावर त्यांना शब्दही फुटत नाही. घरातील घरपणच हरवले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.आचार्य विनोबा भावे हे श्रम व सेवेला ब्रह्मविद्येशी जोडणारे एकमेव व्यक्ती आहेत. शब्दांचा जिवंतपणा ओळखण्यासाठी विनोबा वाचले पाहिजे. त्यांनी दुर्जनांची शक्ती कमी करून सज्जनांची चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.मठकर यांनी विनोबा भावे यांच्यासंदर्भातील जुन्या आठवणी सांगून लोकांनी एकत्र येऊन हृदय जोडण्याचे काम केले पाहिजे, असे नमूद केले.विनोबा भावे यांच्याजवळ दैवी संपत्ती होती. ते स्वत:ही आपण या जगातले नाही असे मानत. त्यांचे चरित्र वाचावे तेवढे कमी आहे, असे घुमरे यांनी सांगितले.विनोबा भावे सर्वांचे असले तरी त्यांच्यावर विदर्भाचा जास्त अधिकार असल्याचे मत डॉ. लेले यांनी व्यक्त केले. प्रा. विशाखा बागडे यांनी संचालन तर डॉ. दमयंती पांढरीपांडे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)