शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हॅन्ड सॅनिटायझर लावून दिवे पेटवू नका :  होऊ शकतो धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 00:43 IST

दिवे किंवा मेणबत्ती लावतांना ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर टाळावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

ठळक मुद्दे६० ते ९० टक्के ज्वलनशील पदार्थाचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोनाला पराभूत करण्यासाठी आणि देशातील सामुदायिक सामर्थ्य दाखविण्यासाठी नागरिकांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घरात, बाल्कनीत, दारासमोर मेणबत्ती, दिवे, टॉर्च अथवा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. परंतु दिवे किंवा मेणबत्ती लावतांना ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर टाळावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत दिवसातून कित्येकदा याचा वापर करीत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सुद्धा ‘सॅनिटायझर’ वापरण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: प्रभावीपणे काम करण्यासाठी ‘अल्कोहल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर करण्यावर भर दिला आहे. यामुळे हातावरील कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यास मदत होते. अशा ‘अल्कोहल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर’मध्ये ‘आयसो प्रोपाईल अल्कोहल’, ‘इथेनॉल’ किंवा ‘एन-प्रोपेनॉल’चे ६० ते ९० टक्के मिश्रण असते. हे उच्च ज्वलनशील पदार्थ आहेत. यामुळे रविवारी दिवे किंवा मेणबत्ती पेटविताना हाताला सॅनिटायझर लावू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.- हात पेट घेऊ शकतो‘अल्कोहल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर’मध्ये अल्कोहलचे प्रमाण ६० टक्क्यांवर असते. आगपेटी, मेणबत्ती किंवा दिवे लावण्याचा प्रयत्न केल्यास सॅनिटायझर लावलेले हात पेट घेऊ शकतात. मोठा धोका होऊ शकतो. यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा दिवे लावताना या सॅनिटायझरचा वापर करू नये, केला असल्यास हात धुवावेत.डॉ. शर्मिला राऊतप्रमुख, मायक्रोबायलॉजी विभाग, मेयो

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर