शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

संघटित होऊ न संघाची ‘नीती’ हाणून पाडा

By admin | Updated: January 12, 2015 01:05 IST

२०१४ च्या निवडणुकीपर्यंत हिंदू राष्ट्राची भाषा होत नव्हती, आता ती होत आहे. परंतु असे झाले तर देशावर भयंकर संकट येईल. ते कोणत्याही परिस्थितीत रोखले पाहिजे.

मंथन-चर्चा : दलित हत्याकांडावर आरएसएस ‘मौन’ का?नागपूर : २०१४ च्या निवडणुकीपर्यंत हिंदू राष्ट्राची भाषा होत नव्हती, आता ती होत आहे. परंतु असे झाले तर देशावर भयंकर संकट येईल. ते कोणत्याही परिस्थितीत रोखले पाहिजे. यासाठी अभ्यास करून व संघटित होऊ न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नीती दलित समाजाने हाणून पाडावी, असे आवाहन प्रा. भाऊ लोखंडे यांनी रविवारी केले. हिंदी मोरभवन येथे आयोजित देशातील दलित हत्याकांडावर आरएसएस मौन का? या मंथन-चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी होते.देशातील बहुसंख्यक लोकांचा धाक अल्पसंख्यक लोकांच्या मनात नसावा. परंतु आज देशातील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू सुरक्षित तर देश सुरक्षित असा प्रचार चालविला आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता येताच हिंदुत्वाची भाषा सुरू झाली आहे. देशाची एकात्मता व अखंडतेसाठी हा धोक्याच्या इशारा असल्याचे त्यांनी सांतिगले. सत्तेवर येताच भाजप व संघाने हिंदू राष्ट्राची भाषा सुरू केली आहे. यापासून देशाला धोका आहे. याचा विरोध करण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. क ोणताही चमत्कार रात्रीतून घडत नसतो. चळवळ ही मांजराच्या पावलाने चालत असते. भविष्याचा विचार करताना इतिहासही विसरता येणार नाही,असे रणजित मेश्राम म्हणाले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर नंतरच्या ६६ वर्षांच्या काळात संघाच्या लोकांनी अपमान सहन केला. सत्ता परिवर्तनासाठी त्यांना इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागली. देशाची फाळणी झाली तेव्हा लाखो लोकांचे बळी गेले होते. परंतु त्याही वेळी देशातील अल्पसंख्यक लोकांना असुरक्षित वाटत नव्हते. कारण सत्ता संघाच्या हातात नव्हती. देशातील सत्ता परिवर्तनासाठी दलित समाजालाही प्रतीक्षा करावी लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. संदीप नंदेश्वर, दिनेश अंडरसहारे व अशोक सरस्वती आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विनायक जामगडे यांनी तर संचालन निरंजन वासनिक यांनी केले.(प्रतिनिधी)कार्यक्र मात चप्पल भिरकावलीप्रा. प्रवीण कांबळे व अशोक सरस्वती यांनी आपल्या भाषणातून एकमेकांवर टीका केली. यातून प्रकरण हमरीतुमरीवर आले. रागाच्या भरात कांबळे उभे झाल्याने भाषण देत असलेले सरस्वती यांनी त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. यामुळे काही वेळ कार्यक्रमात गोंधळ उडाला होता.