शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
6
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
7
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
8
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
9
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
10
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
11
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
12
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
13
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
14
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
15
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
16
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
19
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
20
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय गाठल्याशिवाय शांत बसू नका

By admin | Updated: January 22, 2015 02:53 IST

सारथी मानपत्र मिळालेल्या पुरस्कारकर्त्यांचे सामाजिक दायित्व वाढले आहे.

नागपूर : सारथी मानपत्र मिळालेल्या पुरस्कारकर्त्यांचे सामाजिक दायित्व वाढले आहे. त्यामुळे पुरस्कार मिळालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भविष्यात समाजासाठी भरीव कामगिरी करून ध्येय गाठल्याशिवाय शांत बसू नये, असे प्रतिपादन एअर मार्शल पी. पी. खांडेकर यांनी आज येथे केले.
लघु उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था सारथीच्या कुसुमताई वानखेडे सभागृहातील मानपत्र वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर महालेखाकार कार्यालयाच्या अधिकारी शीला जोग, राजेंद्र राठी, सारथीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वझलवार, ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक, डॉ. मधुकर आपटे, प्रशांत काळे उपस्थित होते. एअर मार्शल पी. पी. खांडेकर म्हणाले, सारथी संस्थेने सागर मंथन करून विदर्भातील रत्नांना शोधून काढले आहे. पुरस्कार विजेत्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. शीला जोग म्हणाल्या, माणूस नवनिर्माण करू शकत नसून पुनर्निर्माण करणे त्याच्या हाती आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन इतरांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांनी सारथीच्या वाटचालीची माहिती देऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील श्रीनिधी घटाटे, प्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे, क्रीडा क्षेत्रातील रुचा औरंगाबादकर, संगीत क्षेत्रातील नंदिनी सहस्रबुद्धे, क्रीडा क्षेत्रातील मोना मेश्राम, उद्योग आणि नंदकिशोर सारडा, वाणिज्य क्षेत्रातील सुहास बुद्धे, ग्रामीण विकास, वनीकरण आणि ऊर्जा नुतनीकरण क्षेत्रातील पद्मश्री अच्युत गोखले यांना सारथीच्या मानपत्राचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविकातून मधुकर आपटे यांनी सारथीच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. डॉ. अनिरुद्ध वझलवार यांनी सारथीच्या मानपत्रामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमात स्वराली संस्थेच्या गायिकांनी पसायदान सादर केले. संचालन स्वाती सुरंगळेकर यांनी केले. आभार अ‍ॅड राजेंद्र राठी यांनी मानले.