शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे वितरण २२ ला

By admin | Updated: March 19, 2016 02:29 IST

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती

नागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार यंदा २२ मार्च रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथील इनडोअर स्टेडियममध्ये सायंकाळी ६ वाजता होईल.हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायक के. के. यांच्या गीतांची रंगत या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल. याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार रुपकुमार राठोड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायक के. के. आणि त्यांचा समूह गीतसंगीताची जादू दाखवणार आहेत. त्यामुळे रसिकांसाठी त्यांचे सादरीकरण अविस्मरणीय ठरणार आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांनी महाराष्ट्र आणि गोवा येथे लोकमत सखी मंचची स्थापना करून सखी अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. आकर्षक सन्मानचिन्हाने होणार गौरव सूर ज्योत्स्ना पुरस्कारासाठी तयार करण्यात आलेले सन्मानचिन्ह खास आकर्षक असणार आहे. यात शंख आणि ग्रामोफोनची आकृती असेल. भारतीय संस्कृतीत शंखनादाला विशेष आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. शंखात समुद्राचे भावविभोर करणारे संगीत सामावले आहे तर ग्रामोफोन संगीतातील आधुनिक बदल प्रतीत करणारा आहे. प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या संमिश्रतेतून संगीताचे महत्त्व प्रदर्शित करण्याचा उद्देश यात आहे. हे सन्मानचिन्ह बडोद्याचे प्रसिद्ध शिल्प कलावंत संदीप पिसाळकर यांनी तयार केले आहे.