शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

जनधन योजनेतील महिलांच्या खात्यात थेट ५०० रुपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 20:04 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये पंतप्रधान जनधन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे ५०० रुपये रोख जमा केले आहेत.

ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाची मदत : लाभार्थींना विड्रॉलची सोय, पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये पंतप्रधान जनधन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे ५०० रुपये रोख जमा केले आहेत. ही रक्कम खातेदारांना ३ एप्रिलपासून विड्रॉल करता येईल. या संदर्भातील पत्र केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सहसचिव सुचिन्द्र मिश्रा यांनी जारी केले आहे.रोख रक्कम जमा केल्याचे पत्र स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका व प्रमुख खासगी क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. या संदर्भातील घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २६ मार्चला केली होती. त्यानुसार ५०० रुपयांची सानुग्रह राशी महिलांच्या खात्यात २ एप्रिलपासून जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून खातेदार महिलांना रक्कम संबंधित शाखा आणि एटीएममधून विड्रॉल करता येईल. जनधन योजनेतील बँक खात्याचा शेवटचा क्रमांक शून्य अथवा एक असेल त्यांना ३ एप्रिलला ५०० रुपये विड्रॉल करता येणार आहे. याशिवाय शेवटचा क्रमांक दोन अथवा तीन असेल त्यांना ४ एप्रिलला, चार अथवा पाच असेल त्यांना ७ एप्रिलला, सहा किंवा सात असेल त्यांना ८ एप्रिलला आणि आठ किंवा नऊ असेल त्या लाभार्थींना ९ एप्रिलला ५०० रुपये विड्रॉल करण्याची सोय आहे. याशिवाय ९ एप्रिलनंतरही खातेदाराला शाखेत जाऊन बँकिंग वेळेत रक्कम काढता येईल.बँक ५०० रुपये संबंधित खात्यात जमा करणार आहे. त्यानंतर उपरोक्त तारखांना बँकेतर्फे खातेदारांना मेसेज पाठविण्यात येणार आहे. बँकेतून पैसे विड्रॉल करण्यासाठी केंद्र सरकारने स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मदत करावी, असे पत्र राज्य शासनाला पाठविले आहे. याशिवाय शाखांचे अधिकारी आणि बिझनेस प्रतिनिधींना सूचना देण्यास सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिला