शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएचडी’ करणे होणार कठीण

By admin | Updated: November 13, 2015 02:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’संदर्भातील नियम आणखी कडक करण्याचे ठरविले आहे.

नागपूर विद्यापीठ : नोंदणीसाठी ‘पेट’ अनिवार्य, प्रक्रिया ‘आॅनलाईन’नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’संदर्भातील नियम आणखी कडक करण्याचे ठरविले आहे. ‘पीएचडी’ करताना ‘युजीसी’च्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणारच आहे. शिवाय ‘पीएचडी’ची पूर्ण प्रक्रिया ‘आॅनलाईन’ करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. याशिवाय नोंदणीसाठी सर्वाना ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) अनिवार्य करण्यात येणार आहे. या सुधारणांसाठी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने मसुदा तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ करणे फार सोपे असल्याचा अनेकांमध्ये समज आहे. ‘युजीसी’च्या पूर्ण नियमावलीचे पालन येथे करण्यात येत नसल्याची ओरड होत होती. शिवाय विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे ‘पीएचडी’च्या स्तरातदेखील वाढ करण्याची प्रशासनाला आवश्यकता वाटत होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन विद्यापीठाने ८ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. यात प्र-कुलगुरूंसमवेत डॉ.अरविंद चौधरी, डॉ. विनायक देशपांडे, डॉ.राजू मानकर यांच्यासारख्या तज्ज्ञांचा समावेश आहे.‘आयटी रिफॉर्म्स’चा अवलंब करत असताना ‘पीएचडी’ प्रक्रियादेखील ‘आॅनलाईन’ करण्यात येणार आहे. यात अर्ज सादर करण्यापासून ते अगदी ‘सिनॉप्सिस’चे सादरीकरणदेखील ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच व्हावे याकरिता प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे अनेक गैरप्रकारदेखील नियंत्रणात येतील. या समितीने या सर्व मुद्यांवर सखोल अभ्यास करुन मसुदा अहवाल तयार केला आहे.आजच्या तारखेत ‘नेट’ किंवा ‘सेट’ उत्तीर्ण असलेले किंवा संशोधन तसेच ठराविक वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेल्यांना ‘पेट’पासून सूट देण्यात येते. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांत असे काहीही नाही. त्यामुळे ही सूट विद्यापीठातूनदेखील काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)‘जर्नल’चीदेखील मिळणार यादी‘पीएचडी’दरम्यान ‘कोर्सवर्क’ करणे विद्यार्थ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु या ‘कोर्सवर्क’चे कुठेही मूल्यांकन होत नाही. याच्या मूल्यांकनासंदर्भात या समितीकडून शिफारशी होण्याची शक्यता आहे. शिवाय शोधपत्रिकांचे प्रकाशन कोणत्या ‘जर्नल’मध्ये व्हावे याची यादीदेखील विद्यापीठाकडूनच देण्यात येईल. तसेच संशोधकाला प्रबंध सादर करण्यापूर्वी संबंधित अभ्यासकेंद्रात त्याचे सादरीकरण देणे अनिवार्य राहणार आहे. ६ जुलै रोजी ‘युजीसी’ने ‘पीएचडी’संदर्भात जी नियमावली जारी केली तिचे तंतोतंत पालन करण्यासंदर्भात ही समिती काम करेल, असे प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले.