शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

समान प्रश्नासाठी वेगवेगळे धोरण अस्वीकार्य

By admin | Updated: February 6, 2015 01:01 IST

राज्य शासनाच्या विविध विभागांना समान प्रश्नावर वेगवेगळे धोरण लागू करण्याची कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या

हायकोर्टाचा खुलासा : राज्य शासन एकच असल्याचे मतराकेश घानोडे - नागपूरराज्य शासनाच्या विविध विभागांना समान प्रश्नावर वेगवेगळे धोरण लागू करण्याची कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना केला आहे. विभाग विविध असले तरी राज्य शासनाचे अस्तित्व मात्र एकच आहे, असे मत निर्णयात व्यक्त करण्यात आले आहे. विविध विभाग आपापल्यापरीने वेगवेगळे धोरण अंमलात आणण्यास स्वतंत्र आहेत, अशी भूमिका राज्य शासनाने मांडली होती. या भूमिकेत काहीच अर्थ नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्य शासन एकच असून शासनाच्या विविध विभागांना वेगवेगळे धोरण निश्चित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेगवेगळे धोरण लागू करण्याची मुभा दिल्यास एखाद्या विभागातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल किंवा त्यांना इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्तीचे फायदे मिळतील, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. प्रशिक्षित शिक्षकांच्या बाबतीत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व आदिवासी विकास विभागाच्या धोरणामध्ये फरक आहे. हे प्रकरण निकाली काढताना न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी वरीलप्रमाणे खुलासा केला आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बी. एड. पदवीधारक उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली असेल आणि त्यानंतर या उमेदवाराने निर्धारित कालावधीत डी.एड. पदवी प्राप्त केली असेल तर अशा शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षक समजण्यात यावे व त्यांना प्रशिक्षित शिक्षक श्रेणीच्या वेतनासह इतर लाभ देण्यात यावेत, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासंदर्भात ११ नोव्हेंबर २०११ रोजीचा ‘जीआर’ जारी करण्यात आला आहे. परंतु आदिवासी विकास विभागाद्वारे संचालित आश्रम शाळांतील शिक्षकांना या ‘जीआर’नुसार लाभ देण्यात येत नाही. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध आश्रम शाळांमध्ये कार्यरत सहा शिक्षकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.