शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

‘डायबेटिज’ शिकवितो अनुशासन

By admin | Updated: August 18, 2014 00:37 IST

चालणे, व्यायाम करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु व्यक्तीला ते सांगितले तर ती कंटाळा करते. परंतु एखादा मधुमेही रुग्ण मात्र नियमितपणे व्यायाम करतो. किती खायचे,

हॅलो डायबेटिजला उत्स्फूर्त प्रतिसाद : मधुमेहतज्ज्ञ सुनील गुप्ता यांचे प्रतिपादन नागपूर : चालणे, व्यायाम करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु व्यक्तीला ते सांगितले तर ती कंटाळा करते. परंतु एखादा मधुमेही रुग्ण मात्र नियमितपणे व्यायाम करतो. किती खायचे, किती चालायचे, कोणता आहार घ्यायचा याबाबत तो जागरूक असतो. तेव्हा डायबेटीज रुग्णाला जीवनात अनुशासन शिकवित असतो, त्यामुळे हा आजार शाप नसून एक प्रकारे वरदानच आहे. रुग्णांनी सकारात्मक विचार करावा, असा मोलाचा सल्ला मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी दिला. डायबेटिज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी ‘हॅलो डायबेटिज’ हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अविनाश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, मनपा आयुक्त श्याम वर्धने, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक, कुलगुरू डॉ. दिलीप गोडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खा. अविनाश पांडे यांनी उपस्थित मधुमेही रुग्णांना जीवनात सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले. डॉ. सुनील गुप्ता यांनी व्याख्यानात डायबेटीज आजाराविषयी सखोल मार्गदर्शन केले. व्यायाम हा शरीरासाठी नेहमीच चांगला असतो परंतु जो व्यायाम व्यक्तीला आवडत असेल तोच केला पाहिजे. कुणाला डान्स करणे तर कुणाला पोहणे आवडत असेल तर तो सुद्धा व्यायामाचाच एक प्रकार आहे. आठवड्यात १५० मिनिटे चालणे हा सर्वोत्कृष्ट व्यायाम असल्याची पावतीसुद्धा त्यांनी यावेळी दिली. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात ‘मधुमेह आणि डोळे’ यावर डॉ. अजय अंबादे, ‘मधुमेह आणि तणाव’ यावर डॉ. सुधीर भावे, आहार यावर कविता गुप्ता, फूट केयर यावर विनिता मेहता यांनी मार्गदर्शन केले. छोट्या-छोट्या नाटकांद्वारे आणि पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे मधुमेहासंबंधातील समज गैरसमजासह सखोल माहिती सादर करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. मधुमेहाबाबत प्रश्न विचारणाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी आहार प्रदर्शन भरविण्यात आले होते. आर.जे. नितीन यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)