शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर आज धम्मदीक्षा समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 02:59 IST

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त (वैशाख पौर्णिमा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर बुद्ध जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

बुद्ध जयंती : शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त (वैशाख पौर्णिमा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर बुद्ध जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत शनिवारी दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय शहरात विविध संस्थांतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दीक्षाभूमीवर शनिवारी सकाळी ६.३० वाजता बुद्धवंदना व उपोसथ व्रत ग्रहण होईल. ८ वाजता सामूहिक धम्मदीक्षा सोहळा होईल. सकाळी ११ वाजता संघदान व भोजनदान होईल. सायंकाळी ६.३० वाजता बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित नाटिका सादर केली जाईल. सायंकाळी ७.३० वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदंत विमलकीर्ती गुणसिरी व भदंत आनंद हे धम्म प्रवचन देतील. (प्रतिनिधी)बुद्धनगरात संगीतमय बुद्ध पहाट बुद्ध जयंतीनिमित्त शनिवारी कामठी मार्गावरील बुद्धनगरातील बुद्धपार्क येथे पहाटे ५.१५ वाजता ‘बुद्ध पहाट’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध् गायिका छाया वानखेडे-गजभिये आणि सहकारी यानिमित्ताने बुध्द व सोबतच भीमगीते सादर करतील. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे प्रमुख अतिथी राहतील.त्यांच्यासोबत या कार्यक्रमात प्रीती धाकडे, प्रीती गजभिये, श्याम जैन, मिलिंद जिभे गीत सादर करतील. त्यांना राहुल देशमुख (तबला), नागेश गेडाम(की बोर्ड), उल्हास चिटमुलवार (आॅक्टोपॅड), विनीत (ढोलक), लेखराज वंजारी (गिटार), राज चौधरी (हार्मोनियम व निवेदन) वाद्यवृंदाची साथसंगत असेल.ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्धवंदना कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त शनिवारी सकाळी ६ वाजता पूज्य भिक्षु संघाच्या प्रमुख उपस्थितीत परित्राण पाठ व विशेष बुद्धवंदना आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ८ ते ९ या वेळात सामूहिक विपश्यना करण्यात येईल. सकाळी ११ वाजता भिक्षु संघाला भोजनदान देण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते ड्रॅगन पॅलेस टेम्पलपर्यंत शांती मार्च काढण्यात येईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, नगराध्यक्षा रिजवाना कुरैशी प्रामुख्याने उपस्थित राहतील.