शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

डेंटलच्या १० जागा जाणार!

By admin | Updated: July 12, 2014 02:21 IST

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) बीडीएस अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ४० वरून ५० करण्यासाठी डेंटल कौंसिल आॅफ इंडियाने (डीसीआय) मागील वर्षी आपल्या निकषावर मंजुरी दिली.

सुमेध वाघमारे नागपूरशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) बीडीएस अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ४० वरून ५० करण्यासाठी डेंटल कौंसिल आॅफ इंडियाने (डीसीआय) मागील वर्षी आपल्या निकषावर मंजुरी दिली. परंतु या वर्षी निकषाची पूर्तता झाली नसल्याचे आढळून आल्यावर आक्षेप घेत, आठवड्याभरात त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले. मात्र, महिनाभराचा कालावधी होत असतानाही रिक्त जागा भरण्यास महाविद्यालयाला अपयश आल्याने वाढलेल्या दहा जागा हातून जाण्याची दाट शक्यता आहे.नागपुरातील दंत महाविद्यालय हे मध्य भारतातील रु ग्णांसाठी आशेचा किरण आहे. त्यामुळे येथे दररोज किमान दीड हजार रुग्ण येतात. रु ग्णांची संख्या पाहता दंत चिकित्सकांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी केंद्र सरकारच्या वैद्यकीय मंत्रालयाकडे डिसेंबर महिन्यात पाठविला. या प्रस्तावावरून डीसीआयच्या द्विसदस्यीय समितीने जून महिन्यात महाविद्यालयाचा दौरा केला. यात महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, शिक्षक, ग्रंथालय, यंत्रसामुग्री, बाह्य व आंतर रु ग्ण विभागातल्या सुविधा, सक्षमता याची पाहणी केली, तसा अहवालही पाठविला. १९ जून रोजी पाठविलेला हा अहवाल २३ तारखेला दंत महाविद्यालयाला मिळाला. यात जुन्याच त्रुटींची पूर्तता न झाल्याचे निदर्शनास आणून आवश्यक यंत्र सामग्रीसह एक प्राध्यापक व तीन सहयोगी प्राध्यापक अशा चार रिक्त जागा आठवड्याभरात भरण्याचे निर्देश दिले. दंत महाविद्यालयाला यंत्र सामग्रीची समस्या सोडविण्यास यश आले. रिक्त जागा भरण्याच्या मंजुरीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे पत्र पाठविले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी याला मंजुरी मिळाली. यामुळे महाविद्यालयाने रिक्त जागा लवकरच भरण्यात येईल, असे हमीपत्र डीसीआयकडे पाठविले. परंतु या वर्षी डीसीआय हमीपत्रावर मानणार नसल्याची माहिती आहे. यामुळे यावर्षी बीडीएस अभ्यासक्रमांच्या ४० जागांवरच प्रवेश प्रक्रिया थांबण्याची शक्यता आहे.