वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीला जोर ! आंदोलन समिती १६ डिसेंबरला काढणार लाँग मार्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:38 IST2025-11-04T14:19:29+5:302025-11-04T14:38:54+5:30
Nagpur : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली.

Demand for a separate Vidarbha state gains momentum! The agitation committee will take out a long march on December 16th
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १६ डिसेंबर २०२५ रोजी शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरापासून चिटणीस पार्कपर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार असून, चिटणीस पार्कवर विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली. बैठकीला समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. वामनराव चटप, महिला अध्यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर व ११ जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत १६ डिसेंबरला लाँग मार्च काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत मिशन २०२७ अंतर्गत २०२७ पूर्वी विदर्भ राज्य मिळविण्याचा संकल्प करण्यात आल्याचे अॅड. चटप यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला रंजना मामर्डे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुकेश मासूरकर, अरुण केदार, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, सुनील चोखारे, तात्यासाहेब मते, नरेश निमजे, प्रदीप सिरस्कर, प्रवीण राऊत उपस्थित होते.