शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सीमा तपासणी नाक्यांवरील बॅरिकेटस् हटवा

By admin | Updated: July 24, 2015 02:50 IST

राज्यातील सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी महामार्गांवर लावण्यात आलेले बॅरिकेटस् हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ..

हायकोर्टाचे आदेश : महामार्गावरील वाहतुकीला अडथळानागपूर : राज्यातील सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी महामार्गांवर लावण्यात आलेले बॅरिकेटस् हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य शासनास दिले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्यातील २२ सीमा तपासणी नाक्यांच्या आधुनिकीकरणाचे काम महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क कंपनीला दिले आहे. या कंपनीने मालवाहू वाहनांची तपासणी करण्यासाठी महामार्गावर बॅरिकेटस् लावले आहेत. यामुळे कार, मोटरसायकल अशा बिगरमालवाहू वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही कृती राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने शासनाला वरीलप्रमाणे आदेश दिले.यासंदर्भात परमजितसिंग कलसी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. यापूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने प्रतिज्ञापत्र दाखल करून महामार्गावर बॅरिकेटस् लावणे अवैध असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) यांनी प्राधिकरणच्या उत्तराच्या उलट माहिती दिली होती. महामार्गावर खासगी गाड्यांची तपासणी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेटस् लावले जातात. तपासणी झाल्यानंतर बॅरिकेटस् हटविले जातात, असे त्यांनी सांगितले होते. यामुळे न्यायालयाने प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) यांना व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) न्यायालयात उपस्थित झाले होते. सीमा तपासणी नाक्यांवर ट्रक, ट्रेलर अशा मालवाहू वाहनांचे वजन व मालाची माहिती संकलित करण्यात येते. महाराष्ट्र मोटर वाहन नियम २२३ (६)अनुसार ट्रक व इतर मालवाहू वाहनांचे वजन करताना मोटर वाहन निरीक्षकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. ८ एप्रिल २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार वाहनाचे वजन करणे, मालाची माहिती नमूद करणे, स्कॅनिंग करणे, पार्किंग इत्यादीसाठी मालवाहू वाहनांकडून प्रक्रिया शुल्क वसूल करायला पाहिजे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कांद्री (ता. रामटेक) व राष्ट्रीय महामार्ग ४७ वरील खुर्सापार (ता. सावनेर) येथे आधुनिक सीमा तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एस. एस. ढेंगळे तर, ‘एनएचएआय’तर्फे अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)