शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर पुन्हा हरीण

By admin | Updated: November 4, 2015 03:00 IST

मागील महिन्यात राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या विमानासमोर डुक्कर आल्याची घटना ताजी असताना मंगळवारी

नागपूर : मागील महिन्यात राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या विमानासमोर डुक्कर आल्याची घटना ताजी असताना मंगळवारी पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीच्या जवळ एक हरीण आढळल्यामुळे खळबळ उडाली. यावेळी इंडिगोची दिल्ली-नागपूर, नागपूर-पुणे आणि सायंकाळी इंडिगोची मुंबई-नागपूर फ्लाईट होती. सुदैवाने हरीण धावपट्टीवर न आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु रेस्क्यू टीमला हरीण सापडले नसल्यामुळे आणखी हा धोका कायम आहे.राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी डुक्कर आढळल्यानंतर ‘डीजीसीए’ (डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हील एव्हीएशन) ने १६ सप्टेबरला विमानतळाची पाहणी केली. या दरम्यान विमानतळ प्रशासनाने यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सतर्क राहण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तरीसुद्धा विमानतळावर मंगळवारी सकाळी ११ वाजता एक हरीण धावपट्टीपासून काही अंतरावर आढळले. त्यानंतर त्वरित वन विभागाला सूचना देण्यात आली. परंतु रेस्क्यु टीमजवळ चार चाकी वाहन नसल्यामुळे त्यांना पोहोचण्यास विलंब झाला. त्यांनी विमानतळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत हरीणाचा शोध सुरु केला. अनेकदा त्यांना हरीण दिसले. परंतु जवळच्या झुडुपात ते निघून गेले. सायंकाळपर्यंत त्याचा लपंडाव सुरू होता. अखेर रेस्क्यु टीम निघून गेली. बुधवारी पुन्हा हरीण शोधण्याची मोहीम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी) प्रशिक्षणाचा अभावसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वन विभागाच्या रेस्क्यु टीमला हरीण, माकड आणि इतर प्राणी पकडण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यांच्याजवळ साधनांचाही तुटवडा आहे.