शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यात वीजदर कमी करा

By admin | Updated: May 25, 2017 02:00 IST

भाजपा व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चा आणि नागपूर शहरातील विविध असोसिएशनने आपापल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत दिले.

भाजपा व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चा आणि नागपूर शहरातील विविध असोसिएशनने आपापल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत दिले. यावेळी आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. परिणय फुके आणि भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय वाधवानी, महामंत्री अशोक शनिवारे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व निवेदनांवर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी आणि राईस अ‍ॅण्ड ग्रेन ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शनिवारे यांनी तांदूळ आणि कणकी सेसमुक्त करण्याची मागणी केली. धानावर सेसच्या आकारणीनंतर तांदळावर सेस घेऊ नये. नागपूर चिलीज मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद गर्ग व सचिव संजय वाधवानी यांनी लाल मिरची जीएसटीमध्ये करमुक्त करण्याची मागणी केली. कांदे-बटाटे असोसिएशनचे विश्वबंधू गुप्ता यांनी कळमन्यात आकारण्यात येणारे प्रति युनिट १५ रुपये वीजदर कमी करण्याची मागणी केली. कळमन्यात धान्य, मिरची, कांदे-बटाटे बाजारात सर्व असोसिएशनची ९०० दुकाने आहेत. सन १९८६ नंतर नोंदणीकृत विक्रीपत्र अजूनही करून दिलेले नाही, शिवाय सेसचे दर १.०५ टक्क्यांवरून ३५ पैसे करण्याची मागणी केली. आरो चिल्ड वॉटर सप्लाय असोसिएशनचे अध्यक्ष विमल अग्रवाल आणि प्रशांत दहिकर यांनी असोसिएशनच्या सर्व व्यावसायिकांना परवाना द्यावा, कारवाई बंद करावी आणि त्यातून योग्य मार्ग काढण्याची मागणी केली.