शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

४०९ कलमावरील आक्षेपावर आज निर्णय

By admin | Updated: January 5, 2016 03:28 IST

श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी दाखल भारतीय दंड विधानाच्या कलम ४०९ विरुद्ध बचाव पक्षाने घेतलेल्या

नागपूर : श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी दाखल भारतीय दंड विधानाच्या कलम ४०९ विरुद्ध बचाव पक्षाने घेतलेल्या आक्षेपावर उद्या मंगळवारी एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात निर्णय होणार आहे. तसेच समीर जोशीसह सर्व अकराही आरोपींविरुद्ध आरोप निश्चित होणार आहेत. या प्रकरणी भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, २०१, १२० ब, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्तसंबंध) संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ आणि भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याच्या ४५ एस, ५८ ब अन्वये गुन्हे दाखल आहेत. एकूणच दाखल कलमांपैकी ४०९ मध्येच जन्मठेपेच्या शिक्षेचे प्रावधान आहे. अन्य कलमांमध्ये केवळ सहा ते सात वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान आहे. समीर जोशी याचे वकील अ‍ॅड. सुभाष घारे यांनी ४०९ या कलमाविरुद्ध आक्षेप घेऊन हे कलम काढण्याची मागणी केली. समीर जोशी हा सरकारी नोकर नाही आणि एजंटही नाही. त्याच्याकडे गुंतवणूकदारांनी विशिष्ट उद्देशासाठी आपापली मालमत्ता गुंतवली होती, म्हणून या प्रकरणात ४०९ हे कलम बसत नाही. यावर विशेष सरकारी वकील अ‍ॅड. बी. एम. करडे यांनी असा युक्तिवाद केला की, श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी याच्याकडे गुंतवणूकदारांनी मोठ्या विश्वासाने आपापली मालमत्ता गुंतवली होती. तो या मालमत्तेचा विश्वस्त आहे, त्याने गुंतवणूकदारांचा विश्वासघात केला आहे. करडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी आणि न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी वासनकर प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा आणि हर्षद मेहता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचा आधार घेतला. न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकूण उद्यापर्यंत निर्णय राखून ठेवला. न्यायालयात मंगळवारीच समीर जोशी, पल्लवी जोशी, श्रीकांत प्रभुणे, निशीकांत मायी, दिलीप डांगे, मोहन पितळे, मुकुंद पितळे, नितीन केसकर, शंतनू कुऱ्हेकर, आनंद जहागीरदार आणि मनोज तत्वादी, अशा ११ जणांविरुद्ध आरोप निश्चित होणार आहेत. आरोपींपैकी समीर जोशी आणि तत्वादी यांना अद्यापही जामीन झालेला नाही.सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित गोविंद मोरे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी समीर जोशी, पल्लवी जोशी व इतरांविरुद्ध १४ सप्टेंबर २०१३ रोजी गुन्हे दाखल केले होते. आतापर्यंत १२४४ गुंतवणूकदार पुढे आले असून फसवणुकीची रक्कम १०० कोटींच्यावर गेलेली आहे. (प्रतिनिधी)आणखी पाहिजे ७० आरोपीश्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या अर्थिक गुन्हे पथकाला आणखी ७० आरोपी पाहिजे आहेत. त्यापैकी ३ आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी एमपीआयडी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. विनोद मायी, विनय दुबे आणि मधुश्री बल्लाळ, अशी आरोपींची नावे असून ते सर्व श्रीसूर्या समूहाचे एजंट होते. या आरोपींपैकी विनोद मायी याने ५५ लाख, बल्लाळने ९७ लाख आणि दुबे याने ३५ लाखांचे कमिशन लाटलेले आहेत. या तिघांच्या अर्जावर १५ जानेवारी रोजी निर्णय होणार आहे. येत्या दिवसात या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आरोपी अटक होण्याची चिन्हे दिसत आहेत.