एक्स्प्रेस बसवर जुलै महिन्यात निर्णय

By Admin | Updated: May 27, 2014 01:44 IST2014-05-27T01:44:48+5:302014-05-27T01:44:48+5:30

चार आॅपरेटरांनी केला दावा नागपूर : खासगी सहभागातून शहरात १०० एक्स्प्रेस बसेस सुरू करण्याचा महापालिकेचा विचार आहे. यासाठी चार बस आॅपरेटरांनी प्रस्ताव दिले आहेत.

Decision in the month of July on the express bus | एक्स्प्रेस बसवर जुलै महिन्यात निर्णय

एक्स्प्रेस बसवर जुलै महिन्यात निर्णय

महापालिका : चार आॅपरेटरांनी केला दावा नागपूर : खासगी सहभागातून शहरात १०० एक्स्प्रेस बसेस सुरू करण्याचा महापालिकेचा विचार आहे. यासाठी चार बस आॅपरेटरांनी प्रस्ताव दिले आहेत. त्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण करून कंत्राट मिळण्यासाठी दावा केला आहे. परंतु पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला जाणार आहे. एक्स्प्रेस बसेससाठी नागपुरातील साई ताज कृपा, अमरावतीच्या अंबा व पुणे येथील दोन कंपन्यांनी निविदा सादर केलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात पुणे व अमरावतीच्या आॅपरेटरांनी तर सोमवारी साई ताज कृपा कंपनीने प्रकल्पाचे सादरीकरण केले. शहरातील प्रवाशांना उत्तम दर्जाची बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी एक्स्प्रेस बससेवा सुरू करण्याची प्रक्रिया गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडीच महिने ही प्रक्रि या ठप्प होती. आचारसंहिता संपताच मनपा प्रशासन सक्रिय झाले होते. परंतु पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे पुन्हा ही प्रक्रि या थांबली आहे. साई ताज कृपा यांनी प्रति बस दर महिन्याला दोन हजार रुपये रॉयल्टी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सर्वप्रथम त्यांनीच ही सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर निविदा प्रक्रि या राबविण्यात आली. चार कंत्राटदारांनी प्रकल्पाचे सादरीकरण केल्याची माहिती उपायुक्त संजय काकडे यांनी दिली. जुलै महिन्यात याबाबतचा अहवाल आयुक्त श्याम वर्धने यांना सादर केल्यानंतर ते यावर निर्णय घेणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Decision in the month of July on the express bus