शहरं
Join us  
Trending Stories
1
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
2
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
3
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
4
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
5
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
6
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
8
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
9
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
10
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
11
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
13
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
14
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
15
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
16
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
17
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
18
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
19
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
20
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डिसेंबर महिना ठरला सर्वात प्रदूषित ! नागरिकांना श्वास घेता येईना, राज्यातील तीन प्रदूषित शहरांमध्ये येते नाव

By निशांत वानखेडे | Updated: January 1, 2026 19:44 IST

Nagpur : पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे, परंतु आता स्थिती बिघडली असून प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातही नागपूरकरांचा श्वास गुदमरायला लागला आहे.

नागपूर : पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे, परंतु आता स्थिती बिघडली असून प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातही नागपूरकरांचा श्वास गुदमरायला लागला आहे. त्यातही महाल क्षेत्रातील नागरिकांसाठी समाेर येणारी स्थिती चिंता वाढविणारी आहे. २४ तासापूर्वी मावळलेल्या वर्षातील डिसेंबर महिन्यात महाल भागात सर्व ३१ दिवस हवा प्रदूषित हाेती, त्यामुळे श्वास घेणे धाेकादायक ठरले आहे.

पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी सांगितले, नागपूर शहर राज्याच्या व केंद्राच्या प्रदूषित शहरांच्या यादीत आले आहे. राज्यात पहिल्या तीन प्रदूषित शहरात उपराजधानीचा समावेश आहे. या प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. शहरालगतचे दाेन्ही औष्णिक वीज केंद्र, दिवसागणिक वाढणाऱ्या वाहनांची संख्या व त्यातून निघणारा धुर, घरगुती कोळसा ज्वलन, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, औद्याेगिकरण आणि माेठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम या कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून स्पष्ट हाेते.

हिवाळ्यात थंडीमुळे वारे संथपणे वाहतात, ज्यामुळे प्रदूषके वाहून न जाता, एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. प्रदूषणामुळे आधिच श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांचा त्रास वाढताे, तसेच नव्याने श्वसनाचे आजार वाढू शकतात. दमा, ब्रॉंकायटिस, टीबी, हृदय रोग आणि मानसिक आजारही बळावले असल्याचे डाॅक्टरांचे मत आहे.

चार केंद्रांची स्थिती

  • महाल क्षेत्रात डिसेंबरच्या ३१ पैकी ३१ दिवस प्रदूषण होते. हे महिन्यातील सर्वाधिक नाेंद आहे. यात ३० दिवस मध्यम, तर एक दिवस प्रदूषणाची स्थिती वाईट आहे.
  • जीपीओ केंद्रावर ३१ दिवसांपैकी २७ दिवस प्रदूषित आढळले. ४ दिवस समाधानकारक, २६ दिवस प्रदूषित, तर १ दिवस जास्त प्रदूषित आढळले.
  • रामनगर येथे ३१ पैकी २५ दिवस प्रदूषित आढळले. त्यात ६ दिवस समाधानकारक, २४ दिवस प्रदूषित, तर १ दिवस जास्त प्रदूषित आढळले.
  • अंबाझरी येथे २२ दिवस प्रदूषित आढळले. त्यात ९ दिवस समाधानकारक, २० दिवस प्रदूषित तर २ दिवस जास्त प्रदूषित आढळले.

धुलीकणांचे प्रदूषण सर्वाधिक

हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी ३, तर जास्तीत जास्त ८ प्रदुषकाना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण (पीएम २.५ व पीएम-१०), ओझोन, कार्बन मोनाॅक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड, अमोनिया, लेड या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो. नागपूर शहर धुलीकणांमुळे सर्वाधिक प्रभावित आहे. पीएम-२.५ चे प्रमाण २५ दिवस वाढले आहे, ज्याचा अर्थ वाहनांचे प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट हाेत असल्याचे प्रा. चाेपणे यांनी सांगितले. यावर नियंत्रणासाठी वृक्षाराेपण, सायकलचा अधिकाधिक वापर, सार्वजनिक वाहनांचा वापर व ई-वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur's December: Most Polluted, Citizens Gasp, Among State's Top Three

Web Summary : Nagpur's air quality plummeted in December, becoming one of Maharashtra's most polluted cities. High levels of pollutants, especially dust particles from vehicles and construction, caused respiratory issues. Experts urge increased tree planting and use of public transport to combat pollution.
टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईPuneपुणेpollutionप्रदूषण