शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४९६ शेतकऱ्यांचे कर्ज माफ

By admin | Updated: November 19, 2015 03:37 IST

जिल्ह्यातील नागपूर, कामठी, भिवापूर, कुही, उमरेड, मौदा, पारशिवनी, काटोेल, रामटेक व हिंगणा आदी दहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ...

जिल्हाधिकारी : आतापर्यंत ३८९७ शेतकऱ्यांचे कर्ज माफनागपूर : जिल्ह्यातील नागपूर, कामठी, भिवापूर, कुही, उमरेड, मौदा, पारशिवनी, काटोेल, रामटेक व हिंगणा आदी दहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जास शासन निर्णयानुसार ४९६ शेतकऱ्यांच्या ९५.८२ लाख रकमेला कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बुधवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात कु र्वे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे रतनसिंह यादव, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा विशेष लेखा परीक्षकांचे प्रतिनिधी डी.एस. परारसे, सहायक निबंधक टी.एन.चव्हाण, अशोक गिरी, सुखदेव कोल्हे, प्रकाश भजनी, अंजुषा गराटे, संजया आगरकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात तालुकानिहाय प्रकरणे अशी, नागपूर -२ सावकार, शेतकरी संख्या १८, कर्जमाफीची रक्कम ६ ,९७ २७७, हिंगणा - ३ सावकार,शेतकरी संख्या ५,कर्जमाफी ८१९४२ , भिवापूर - १ - सावकार, शेतकरी संख्या ६३,कर्जमाफी १३ , ७५१९५ रुपये, रामटेक - २ सावकार,शेतकरी संख्या २४ ,कर्जमाफी ६, ८६ ७६० रुपये,उमरेड -३० सावकार,शेतकरी संख्या १८८, कर्जमाफी ३२,७६ ९८, कुही - ५ सावकार,शेतकरी संख्या ११ कर्जमाफी ८४ ०९८ पारशिवनी - १६ सावकार,शेतकरी संख्या १५५ कर्जमाफी ३०,५५ २५०,मौदा - ४ सावकार,शेतकरी संख्या १२ कर्जमाफी १ ,३४ १४९ रुपये, काटोल - ४ सावकार,शेतकरी संख्या ६ कर्जमाफी ४४ ,७३१ रुपये, कामठी - ८ सावकार,शेतकरी संख्या १४ कर्जमाफी १,४९ ९७१ रुपये.अशा एकूण ७५ सावकाराकडून ४९६ शेतकऱ्यांनी घेतलेल्या ९५, ८२ २५० रुपयाच्या कर्जाला माफी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यत २०७ सावकारांकडून ३८९७ शेतकऱ्यांचे ६,६५, २७ ३१० रुपयाचे कर्ज माफ करण्यात आले आहे.जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जदारांची प्रकरणे तालुकास्तरीय समितीने अद्याप निकाली काढलेली नाही. अशी प्रकरणे ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत दाखल करण्याची सूचना कुर्वे यांनी केली. परवानाधारक सावकारांनी त्यांचे स्तरावरील पात्र कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज मजुरीचे प्रस्ताव सहायक निबंधक यांचेकडे सादर करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)