शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परच्या धडकेत बालकाचा मृत्यू

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

मोठ्या आई-वडिलांसह लग्न समारंभाला जाण्यासाठी निघालेल्या बालकावर टिप्परच्या रूपातील काळाने झडप घातली.

नागपूर : मोठ्या आई-वडिलांसह लग्न समारंभाला जाण्यासाठी निघालेल्या बालकावर टिप्परच्या रूपातील काळाने झडप घातली. बालकाचा मृत्यू झाला तर त्याचे मोठे वडील आणि आई गंभीर जखमी झाली. नंदनवनमधील खरबी ते वाठोडा रिंगरोडवर मंगळवारी दुपारी ११.५० ला हा भीषण अपघात घडला. हुडकेश्वर खरसोली येथील रहिवासी सोपान पेठे यांच्या नातेवाईकाचे लग्न आज पारडीत होते. त्यासाठी सोपान पेठे त्यांची पत्नी संगीता आणि मुलगी अपूर्वा तसेच काही नातेवाईकांसह सकाळीच तिकडे गेले तर, सोपान यांचा मुलगा आयुष (वय ११) आपल्या मोठ्या वडिलांकडे थांबला. दुपारी आयुष त्याचे मोठे वडील ज्ञानेश्वर पेठे आणि मोठी आई वनिता यांच्यासह अ‍ॅक्टिव्हाने पारडीकडे निघाले. मागून आलेल्या टिप्पर (एमएच ३१/ ईएन ०७३६) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून पेठेंच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे तिघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. आयुषला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवनचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. अरुण घोडबाजी पेठे (वय ५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालक रवींद्र शंकरराव बोरकर (वय ४०, रा. पडोळेनगर, हिवरीनगर झोपडपट्टी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. (प्रतिनिधी) लग्न समारंभात शोककळाया घटनेचे वृत्त लग्न समारंभात कळताच तेथे शोककळा पसरली. अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. वनिता आणि ज्ञानेश्वर पेठे यांच्यावर उपचार सुरू आहेत. आयुषच्या मृत्यूने पेठे परिवाराला जबर मानसिक धक्का बसला आहे.