शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या अंतिम अहवालावर निर्णयासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

By admin | Updated: July 6, 2015 02:58 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंदिया येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाला संजय खोब्रागडे हत्याकांड ...

हायकोर्ट : संजय खोब्रागडे हत्याकांड प्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंदिया येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाला संजय खोब्रागडे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या नवीन अंतिम अहवालावर निर्णय घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.३० जून २०१४ रोजी जेएमएफसी न्यायालयाने पोलिसांच्या अंतिम अहवालावरून सर्व आरोपींना आरोपमुक्त केले होते. गेल्या २५ मार्च रोजी उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला व याचिकाकर्त्यांना सुनावणीची संधी देऊन १२ जूनपूर्वी नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या कालावधीत निर्णय झाला नसल्यामुळे मुदत वाढवून देण्यात आली आहे. यासंदर्भात प्रदीप खोब्रागडे व दुर्गा रंगारी यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. संजय खोब्रागडे याचिकाकर्त्यांचे वडील होते. या प्रकरणावर आता ४ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. ऋषिपाल टेंभरे, भाऊलाल हरीणखेडे, श्रीप्रकाश रहांगडाले, कुणाजी ठाकरे, हेमंत ठाकरे व माधुरी टेंभरे अशी आरोपींची नावे आहेत. खोब्रागडे यांचा बुद्धविहाराच्या जागेवरून पवार समाजातील लोकांसोबत वाद होता. यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. १६ मे रोजी मध्यरात्रीनंतर संजय खोब्रागडे यांना अंगावर पेट्रोल ओतून जाळण्यात आले होते. ते ९४ टक्के जळाले होते. गोंदिया येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. वरील आरोपी आरोपमुक्त झाल्यानंतर पोलिसांनी संजयची पत्नी देवकाबाई व राजू गडपायले यांना अटक केली. राजू व देवकाबाई यांनी स्वत:चे अनैतिक संबंध लपविण्यासाठी संजयची जाळून हत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वाहाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)