शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या स्थापना दिवसाला ४० नगरससेवकांची दांडी

By admin | Updated: April 6, 2017 15:54 IST

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त महाल भागातील टीळक पुतळा येथील पार्टीच्या कार्यालयाजवळ गुुरुवारी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त महाल भागातील टीळक पुतळा येथील पार्टीच्या कार्यालयाजवळ गुुरुवारी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेतील पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले होते. तसेच याबाबतच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही ४० हून अधिक नगरसेवकांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. महापालिकेत प्रथमच भाजपाला विक्रमी बहुमत मिळाले आहे. १५१ सदस्यांपैकी तब्बल १०८ सदस्य भाजपाचे आहेत. यात अन्यपक्षातून आलेले व नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या काही जणांचा समावेश आहे. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. नगरसेवक ांना शिस्त लागावी. त्यांना सभागृहाच्या कामकाजाची माहिती व्हावी. याची जबाबदारी महापालिकेतील पक्षाच्या अनुभवी आजी- माजी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रशिक्षण वर्गाचेही आयोजन करण्यात आले. परंतु वेळोवेळी सूचना दिल्यानंतरही शिस्तप्रिय पक्षाच्या ४० हून अधिक नगरसेवकांनी स्थापना दिवसाच्या कार्यक्र माकडे पाठ फिरविली. यात महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांंचाही समावेश आहे. कार्यक्रमाला उपस्थित नगरसेवकांची हजेरी घेण्यात आल्याने हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला.यातील सात नगरसेवकांनी वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला हजर राहता येणार नसल्याचे कळविले होते. परंतु उर्वरित नगरसेवकांच्या अनुपस्थितीचे कारण समजू शकले नाही. यावर पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)नगरसेवकांचा रेकॉर्ड तयार करणारविकासाच्या मुद्यावर भाजपाने महापालिका निवडणूक लढविली. मतदारांनी भाजपा नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवल्याने पक्षाला विक्रमी बहुमत मिळाले आहे. मतदारांच्या विश्वासाला तडा जावू नये यासाठी प्रभागातील विकासाची जबाबदारी नगरसेवकांवर आहे. त्यामुळे भाजपाच्या सर्व नगरसेवकांचा रेकॉर्ड तयार केला जात आहे. यात पक्षाच्या कार्यक्रमात सहभाग, प्रभागातील विकास कामांसाठी केलेले प्रयत्न अशा बाबींचा समावेश आहे.अनुपस्थितांना जाब विचारणारपक्षाच्या स्थापना दिवसाच्या कार्यकमाला पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी उपस्थित राहणे अनिवार्य होते. परंतु या कार्यक्रमाला विना अनुमती अनुपस्थित असलेल्या नगरसेवकांना जाब विचारला जाईल. याबाबत संबंधित नगरसेवकांना महापालिकेतील सत्तापक्षनेते पत्र देऊ न त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार आहेत. कारण नसताना अनुस्थित असलेल्यांना जाब विचारला जाईल. आ. सुधाकर क ोहळे, शहर अध्यक्ष भाजपा