शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरेंच्या खुनाचा तपास न्यायालयाच्या नियंत्रणात व्हावा

By admin | Updated: July 14, 2015 03:13 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला २० जुलैला २३ महिने पूर्ण होत आहे. खुनाचा तपास सीबीआयकडे सोपवूनही काहीही ठोस

नागपूर : डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला २० जुलैला २३ महिने पूर्ण होत आहे. खुनाचा तपास सीबीआयकडे सोपवूनही काहीही ठोस हाती आलेले नाही. अ‍ॅड. गोविंद पानसरेंच्या खुनालाही पाच महिने पूर्ण होत आहे. विशेष तपास पथकालाही काही गवसले नाही. सरकारच्या तपास यंत्रणेवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे दोन्ही खुनाचा तपास न्यायालयाच्या नियंत्रणात व्हावा, यासाठी समितीतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी समितीतर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे. २० जुलैला मुंबईत राज्यव्यापी धरणे देऊन अभियानाची सुरुवात होणार आहे. हे अभियान महिनाभर चालणार आहे. यात राष्ट्रपतींच्या नावे लाखो पोस्टकार्ड लिहिणे, लोकप्रतिनिधींना शिष्टमंडळासह भेटून विचारणा करणे, तालुक्यांमध्ये विविध प्रबोधनाचे कार्यक्रम, जिल्हानिहाय धरणे, निदर्शने, मोर्चे काढण्यात येणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले. तसेच समितीच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण झाली यानिमित्त ७ आॅगस्ट रोजी ‘विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद’ घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात अंनिसच्या २५ वर्षाच्या कार्याचा ऊहापोह आणि भविष्याच्या वाटचालीची क्षेत्रे यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला गजेंद्र सुरकार, संजय शेंडे, विनोद उल्लीपवार, मधुकर धंदरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)