शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांचा कर्दनकाळ मेंढपाळांचा तारणहार

By admin | Updated: July 20, 2014 01:14 IST

धोतर आणि लोकरीचे शर्ट, डोक्यावर फेटा, पायात बूट, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, कपाळभर मळवट, दाढी आणि जटा वाढलेली व्यक्ती कुणालाही संन्यासीच वाटेल. परंतु दिसते तसे नसते हेच खरे.

सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा : नारायण मोठेदेसाई यांचा तरुणाईपुढे आदर्शरूपेश उत्तरवार - यवतमाळधोतर आणि लोकरीचे शर्ट, डोक्यावर फेटा, पायात बूट, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, कपाळभर मळवट, दाढी आणि जटा वाढलेली व्यक्ती कुणालाही संन्यासीच वाटेल. परंतु दिसते तसे नसते हेच खरे. असाच पेहराव करणारी ही व्यक्ती आहे, पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपअधीक्षक नारायण खाणू मोठेदेसाई. सेवानिवृत्तीनंतर धनगर समाजाच्या विकासाचे व्रत घेतलेले नारायणराव मेंढपाळांच्या चराईचा प्रश्न सोडविण्यासाठी रानोमाळ पालथा घालत आहेत. वयाची सत्तरी गाठली तरी ते अविरत कार्यरत आहेत. तरुणांना लाजविणारा त्यांचा उत्साह बघितल्यानंतर आश्चर्याने बोटे तोंडात गेल्याशिवाय राहत नाही. नोकरीत असताना गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले मोठेदेसाई आता मेंढपाळांचे तारणहार झाले आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील मेंढ्यांचा चराईचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर शेकडो मेंढपाळ मुख्य वनसंरक्षकाच्या कार्यालयावर धडकले. मात्र न्याय मिळत नव्हता. शेवटी ही बाब नारायण मोठेदेसाई यांना माहीत झाली आणि ते यवतमाळात दाखल झाले. मेंढी चराईच्या प्रश्नावर त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टाणकोडोली हे त्यांचे जन्मगाव. पोलीस उपअधीक्षक म्हणून ३७ वर्षे सेवा केली. त्यावेळी त्यांच्या बुलेटच्या आवाजाने गुन्हेगार थरथर कापायचे. दारु विक्रेते तर अक्षरश: पळून जायचे. यातूनच त्यांनी अनेक गावात दारूबंदी केली. अनेक गुन्हेगारांना वठणीवर आणले. पोलिसातही त्यांचा दरारा होता. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कोणताही बडेजाव न ठेवता समाजाचे प्रश्न सोडविण्याचे व्रत त्यांनी हाती घेतले. मेंढपाळ अन्याय निवारण समितीची स्थापना केली. आज ते मेंढपाळांसाठी विठ्ठल पुजारी म्हणून काम करतात. मेंढपाळांचा प्रश्न सोडविण्यासाठी ते पोटतिडिकेने भटकंती करतात. मेंढपाळांना सामूहिक निवारा मिळावा, वन जमीन द्यावी, मेंढी चराईसाठी आकारण्यात येणारा कर रद्द करावा, मेंढपाळांच्या मुलांसाठी वस्तीशाळा सुरू करावी, मेंढपाळ बेड्यावर पशुवैद्यकीय सेवा मोफत देण्यात यावी, लोकर साठविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोदाम बांधावे, असे अनेक प्रश्न घेऊन ते शासन दरबारी लढा देत आहेत. मेंढपाळ बांधवांना आपल्या समस्यांबाबत लढण्यासाठी जागृत करीत आहेत.