शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST

नागपूर : कळमनातील डिप्टी सिग्नलमध्ये स्लॅब तोडण्याच्या मशीनची चोरी झाली. रायपूर येथील रहिवासी गौरीशंकर गोदी यांचे डिप्टी सिग्नलच्या बीएसएनएल ...

नागपूर : कळमनातील डिप्टी सिग्नलमध्ये स्लॅब तोडण्याच्या मशीनची चोरी झाली. रायपूर येथील रहिवासी गौरीशंकर गोदी यांचे डिप्टी सिग्नलच्या बीएसएनएल कार्यालयासमोर काम सुरू आहे. तेथे गोदी यांनी सिमेंटचा स्लॅब तोडण्याची मशीन ठेवली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात आरोपीने ७० हजार रुपयांच्या मशीनची चोरी केली. कळमना पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

..........

दारूच्या नशेत युवकाची आत्महत्या

नागपूर : दारूच्या नशेत एका युवकाने नवी कामठीमध्ये आत्महत्या केली. रोशन कृष्णाजी चकोले (वय २६) रा. प्रीती ले-आऊट, असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रोशन पेंटिंगचे काम करीत होता. त्याची पत्नीही मजुरी करते. रोशनला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो कधीतरीच कामावर जात होता. मंगळवारी सकाळी पत्नी पायल गेल्यानंतर रोशनने गळफास घेतला. नवी कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

............

मुलावर हल्ला करून आईला धमकी

नागपूर : आईला अपशब्द बोलण्यास मनाई केली असता एका युवकावर हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना अजनीत घडली आहे. पीयूष फ्रांसीस (वय २२) हा पार्वतीनगरात राहतो. आरोपी नेल्सन मोजेस फ्रांसीस, मोजेस फ्रांसीस, त्याची आई, अंथोनी रॉस, शेरॉन फ्रांसीस आणि नितू फ्रांसीस मंगळवारी सकाळी पीयूष फ्रांसीसच्या आईबाबत अपशब्द बोलत होते. पीयूष आरोपींना समजावत होता. आरोपींनी रॉडने वार करून पीयूषला जखमी केले. पीयूषची आई अरुण पीयूषला वाचविण्यासाठी गेली असता आरोपींनी तिला शिवीगाळ करून धमकी दिली. अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध दंगा करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

........