शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 8:39 PM

अवघ्या साडेतीन वर्षांत साडेचार लाखाचे व्याजापोटी १४ लाख ४४ हजार रुपये घेऊनही पुन्हा ६ लाख रुपये मागणाऱ्या आणि त्यासाठी एका दाम्पत्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या दोन अवैध सावकारांवर हुडकेश्वर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देअवैध सावकारी : साडेचार लाखांचे १४ लाख ४४ हजार उकळलेपुन्हा सहा लाखांची मागणी : कार पळवून नेली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या साडेतीन वर्षांत साडेचार लाखाचे व्याजापोटी १४ लाख ४४ हजार रुपये घेऊनही पुन्हा ६ लाख रुपये मागणाऱ्या आणि त्यासाठी एका दाम्पत्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या दोन अवैध सावकारांवर हुडकेश्वर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.संदीप ऊर्फ सचिन पाटील आणि नितीन तराळ, अशी या आरोपींची नावे आहेत. ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचे समजते. अजनीतील समर्थनगरात राहणारे हे दोघे अवैध सावकारी करतात. महिन्याला ते १० टक्के व्याज घेतात.हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाहूनगर आहे. तेथे राहणारे प्रवीणकुमार तिवारी (वय ४०) यांनी २२ आॅक्टोबर २०१४ ला पाटील आणि तराळकडून महिना १० टक्के व्याजाने ४ लाख ५० हजार रुपये उधार घेतले होते. साडेतीन वर्षांच्या कालावधीत तिवारी यांनी पाटील आणि तराळला साडेचार लाखांच्या बदल्यात १४ लाख ४४ हजार रुपये परत केले. त्याउपरही आरोपींकडून तिवारीला पैशांची नियमित मागणी सुरूच आहे. आणखी सहा लाख रुपये हवेत म्हणून या दोघांनी तिवारी दाम्पत्याला धमकावणे, छळणे सुरू केले. पैसे मिळाले नाही म्हणून आरोपींनी तिवारीच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला अन् त्यांची कार (एमएच ४०/ एसी ६७९२) जबरदस्तीने हिसकावून नेली. धमकीही दिली. त्यामुळे तिवारी दाम्पत्य दहशतीत आले. त्यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते जास्तच दडपणात आले.उपायुक्त भरणेंकडून दिलासाप्रवीण आणि त्यांची पत्नी पिंकी तिवारी या दोघांनी शुक्रवारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांची भेट घेऊन त्यांना आपली कैफियत ऐकवली. अवैध सावकारी करणारे गुंड आणि राजकीय आश्रयामुळे काहीही करू शकतात, अशी भीतीही बोलून दाखवली. उपायुक्त भरणे यांनी त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत हुडकेश्वर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पाटील आणि तराळविरुद्ध खंडणी वसुलीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला.प्राध्यापकाचीही आत्महत्यापाटील आणि तराळ यांनी अशाप्रकारे अनेक गरजूंची मालमत्ता हडपून त्यांना कंगाल केल्याची चर्चा आहे. या दोघांप्रमाणेच शहरात अनेक अवैध सावकार आहेत. अशाच इमरान मसूद खान नामक अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून जुगराम बळीराम लांजेवार नामक प्राध्यापकाने दोन आठवड्यांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. हे प्रकरणही हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडले होते.

टॅग्स :MONEYपैसाCrimeगुन्हा