शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनासाठी निकोप समाज निर्माण करा

By admin | Updated: June 16, 2014 01:07 IST

देशात सर्वत्र आता सकारात्मक परिवर्तन दिसू लागले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारतच जगाला आपल्या संस्कृतीच्या आधारावर मार्गदर्शन करू शकतो, अशी स्थिती आहे.

शांताक्का : राष्ट्र सेविका समितीच्या प्रवीण वर्गाचा समारोप
नागपूर : देशात सर्वत्र आता सकारात्मक परिवर्तन दिसू लागले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारतच जगाला आपल्या संस्कृतीच्या आधारावर मार्गदर्शन करू शकतो, अशी स्थिती आहे. पण परिवर्तन करायचे असेल तर कुणावर विसंबून चालणार नाही. स्त्रियांमध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे. आपल्या संस्कृतीत तर स्त्री शक्ती स्वरूपातच पाहिली गेली आहे. या शक्तीचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी आपण केला पाहिजे. याचा प्रारंभ आपल्या घरापासून करा आणि राष्ट्रापर्यंत व्यापक करा, असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यांनी रविवारी केले.
राष्ट्र सेविका समितीच्या प्रवीण वर्गाचा समारोप आज शक्तीपीठ, रामनगर येथे करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला आयुर्वेदाचार्य शार्दुली तेरवाडकर आणि राजश्री जानी प्रामुख्याने उपस्थित होत्या. शांताक्का म्हणाल्या, सामाजिक आरोग्यासाठी उपाय शोधताना डॉ. हेडगेवार यांनी संघटन शक्तीचा उपयोग केला. संघटनेतून व्यक्तीनिर्माणाचा यज्ञ त्यांनी सुरू केला. त्यानंतर स्त्रियांनाही या कार्यात सहभागी करून घेताना १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची निर्मिती झाली. तेव्हापासून स्त्रियांना सक्षम आणि जागरूक करण्याचा प्रयत्न समितीतर्फे करण्यात येत आहे. परिवर्तन कुणीतरी वेगळा माणूस करीत नसतो. परिवर्तनाचा प्रारंभ आपल्यापासूनच करावा लागतो. त्यासाठी आपल्या विचारांवर कृती आणि कृतीत समर्पण असावे लागते. त्याशिवाय परिवर्तन होत नाही. एक माता संपूर्ण कुटुंबाला संस्कारित करू शकते. आपण माता, भगिनी आहोत. त्यामुळे किमान आपले घर नंतर समाज आणि त्यानंतर राष्ट्र असा प्रवास आपण करायला हवा. हे काम सातत्याने सुरू आहे. यासाठी आपले घर संस्कारित करण्यापासून सुरुवात करा, राष्ट्र संस्कारित होईल, असे शांताक्का म्हणाल्या. याप्रसंगी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या शार्दुली तेरवाडकर यांनी समितीच्या सदस्यांना उद्बोधन केले. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी सामाजिक बांधिलकी जपता येते. हा विचार मनात असला तर प्रत्येक क्षेत्रात मोठे काम उभे राहू शकते, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला प्रशिक्षित समिती सदस्य उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)