शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दाम्पत्य जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST

वाडी : मुरुम भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाले. ही घटना लाव्हा-बाेढारा मार्गावरील ...

वाडी : मुरुम भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाले. ही घटना लाव्हा-बाेढारा मार्गावरील लाव्हा चाैक परिसरात साेमवारी (दि.३०) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना वाडीतील वेलट्रीट हाॅस्पिटलमध्ये भरती केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सूर्यभान राघाेजी ढाेक (५५) व त्यांची पत्नी लीलाबाई सूर्यभान ढाेक (५०) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. सूर्यभान ढाेक हे आपल्या पत्नीसह एमएच-४०/एव्ही-५१७० क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने जात असताना लाव्हा चाैकातील डीपीजवळ खडगाव खदानीतून मुरुम वाहतुकीच्या एमएच-४०/एके-७७१९ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दाम्पत्य जखमी झाले.

लाव्हा-खडगाव मार्गावर खदानी असल्यामुळे या मार्गाने ट्रकची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या मार्गावर गतिराेधक लावणे गरजेचे आहे. या मार्गावर गतिराेधक बसविण्याच्या मागणीसाठी माजी जि. प. सदस्य सुजित नितनवरे यांनी बांधकाम विभाग-२ चे कार्यकारी अभियंता कुच्चेवार यांना निवेदन साेपविले. यावेळी सरपंच ज्योत्स्ना नितनवरे, माजी सरपंच रॉबीन शेलारे, प्रकाश डवरे, राजकुमार बोरकर, यादव इंगळे, नंदलाल नितनवरे, भारत नितनवरे, प्रमोद इंगळे, संजय सावकर, गणेश पंडित, आकाश चाेखांदे, ऋषी धाेंगडे, गंगाधर करंडे आदी उपस्थित होते.