शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

कचराघर झालेल्या विहिरींच्या स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:07 IST

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात हाेणारी भीषण पाणीटंचाईची समस्या साेडविण्यासाठी शहरातील विहिरी लाभदायक ठरू शकतात. मात्र, महापालिका प्रशासन या विहिरींच्या ...

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात हाेणारी भीषण पाणीटंचाईची समस्या साेडविण्यासाठी शहरातील विहिरी लाभदायक ठरू शकतात. मात्र, महापालिका प्रशासन या विहिरींच्या स्वच्छतेबाबत फारसे गंभीरतेने घेत नाही. गाेपालनगरातील विहिरीबाबत हेच दिसून येत आहे. कचराघर झालेली ही विहीर स्वच्छ व्हावी म्हणून नागरिक गेल्या दाेन वर्षांपासून मागणी करीत आहेत; पण मनपाचे लक्ष्मीनगर झाेन प्रशासन त्याकडे कानाडाेळा करीत आहेत.

गाेपालनगर येथे असलेली ही सार्वजनिक विहीर गंगाधरराव फडणवीस यांनी बांधली हाेती. वस्तीतील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा हा यामागचा उद्देश हाेता आणि त्यावेळी त्याचा लाभही झाला. मात्र नळ लाईननंतर विहिरींची उपेक्षा झाली. उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करताना विहिरीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळताे. मात्र, हळूहळू त्या विहिरी कचरा फेकण्याचे स्थान झाले. आतातर विहिरीत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. पाण्याची गरज लक्षात घेत नागरिकांनी ही विहीर स्वच्छ व्हावी म्हणून प्रयत्न चालविले. नगरसेवकांची भेट घेतली, लक्ष्मीनगर झाेनमध्येही निवेदन सादर केले आणि जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन समस्या मांडली. मात्र नगरसेवकांनी दुर्लक्ष केले, तर जलप्रदाय व लक्ष्मीनगर झाेनच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बाेट दाखवत टाळाटाळ केली. माजी महापाैर नंदा जिचकार यांनीही लक्ष दिले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या दाेन वर्षांपासून नागरिकांचा विहीर स्वच्छतेसाठी संघर्ष सुरू आहे; पण मनपा प्रशासनाकडून अवहेलना केली जात असल्याचे स्थानिक रहिवासी नीळकंठ माेकदम यांनी सांगितले. विहिरीत कचरा साचल्याने डासांचा प्रकाेप आणि दुर्गंधीची समस्याही वाढली आहे. त्यामुळे ही विहीर त्वरित स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.