शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपूर शहरातील ३० लाख लोकांचा सर्व्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 20:12 IST

कोरोना संशयित वा बाधित लोकांच्या संपर्कात कुणी आले का, याची शहानिशा करण्यासाठी संपूर्ण नागपूर शहरातील २७ ते ३० लाख लोकांच्या सर्व्हेक्षणाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या ३८ प्रभागात हा सर्व्हे केला जात आहे.

ठळक मुद्दे५.५६ लाख कु टुंबांची माहिती संकलित करणार : गंभीर आजाराच्या रुग्णांवर विशेष लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित चार रुग्ण आढळून आल्याने महापालिकेतर्फे लक्ष्मीनगर व धरमपेठ भागात रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर परिसरातील ६४ हजार ४३६ कु टुंबांचा सर्व्हे करून २ लाख ६४ हजार ६१७ लोकांची माहिती घेण्यात आली. आता उर्वरित आठ झोनमधील ४ लाख ९१ हजार ५६४ कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण शहरातील २७ ते ३० लाख लोकांच्या सर्व्हेक्षणाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या ३८ प्रभागात हा सर्व्हे केला जात आहे. झोन स्तरावर याचे नियोजन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळून यात झोनमधील जवळपास ९० टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. माहिती संकलित करताना कु टुंबातील कुणी विदेशात आहे का, शहराबाहेर जाऊन कुणी आले का, कोरोना संशयित वा बाधित लोकांच्या संपर्कात कुणी आले का, याची शहानिशा केली जात आहे. सर्वेक्षणाला नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. परंतु संचारबंदी असूनही काही नागरिक घराबाहेर दिसतात. त्यांनी घराबाहेर पडू नये. संचारबंदी नागरिकांच्या आरोग्याचे हित विचारात घेऊनच लावण्यात आलेली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी दिली.सर्व्हे नागरिकांच्या हिताचाचलक्ष्मीनगर व धरमपेठ भागातील सर्व्हेत सुदैवाने कुणीही कोरोनाबाधित आढळून आले नाही. परंतु कोरोनाबाबत लोकांनी काय करावे, काय करू नये, नाका-तोंडाला हात लावू नये, घरात बसतानाही किती अंतर ठेवावे, कुु टुंबातील सदस्यांचे वय, त्यांना कुठला आजार आहे का, उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार अशा गंभीर आजाराविषयी माहिती संकलित केली जात आहे. यातून अशा लोकांची विशेष काळजी घेण्याविषयी नियोजन करता येईल, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठासंचारबंदी दरम्यान शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. औषधे, किराणा, भाजीपाला अशा आवश्यक वस्तूंची कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही गररजेपेक्षा जादा साठा करू नये. जीवनावश्यक वस्तूंची होत डिलिव्हरी करता येईल का, याचाही आढावा घेतला जात आहे. दुकानाच्या परिसरातील नागरिकांना मागणीनुसार घरपोच सामानाचा पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची मााहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका